आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:ट्रम्पना सपशेल नाकारले! बायडेन विजयाच्या दिशेने, ट्रम्प यांची समर्थकांना फूस; अनेक शहरांत तणाव

न्यूयॉर्क22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांची टीम संभ्रमात...ट्रम्प यांना पराभव मान्य करण्यास राजी कसे करावे?

वास्तविक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले आहेत. परंतु, हा पराभव स्वीकारण्याचे टाळत आहेत. म्हणूनच २३१ वर्षांची लोकशाही परंपरा असलेल्या या देशात रस्त्यांवर संघर्ष पेटला आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी आकडेवारी पाहता ट्रम्प बहुमतापासून ५४ मतांनी पिछाडीवर आहेत. तर, जो बायडेन ३०६ मते घेतील, अशा स्थितीत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी हवीत २७० मते... रिपब्लिकन्सचा गड असलेल्या पेन्सिल्व्हेनिया व जॉर्जियात बायडेन यांना आघाडी मिळत आहे. मिशिगन व विस्कॉन्सिनमध्ये त्यांनी पूर्वीच आघाडी घेतली आहे. निवडणुकीत मताधिकारावरच शंका घेणारे ट्रम्प पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले आहेत. हाच आरोप ते गुरुवारीही करत राहिले आणि नामांकित वाहिन्यांनी त्यांचे भाषण दाखवणेच बंद केले. सतत भडक विधाने करणाऱ्या या अमेरिकी अध्यक्षावर अशी नामुष्की ओढवली.

ट्रम्प यांची टीम संभ्रमात...ट्रम्प यांना पराभव मान्य करण्यास राजी कसे करावे?
द न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ट्रम्प यांच्या प्रचार टीमने पराभव मान्य केला आहे. मात्र टीममधील एकही अधिकारी पराभव मान्य करण्यासाठी ट्रम्प यांची समजूत घालू शकलेला नाही. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या परंपरेनुसार जो पराभूत होतो तो एक भाषण देतो. त्याला कन्सेशन स्पीच म्हटले जाते. आता ट्रम्प यांना कन्सेशन स्पीच देण्यासाठी कोण राजी करणार, त्यांच्या चमूसमोर यक्षप्रश्न आहे. ट्रम्प कन्सेशन स्पीचची परंपरा कायम ठेवतात की नाही? पराभव मान्य केला तर ते काय म्हणतील, याचे औत्सुक्य आहे.

पाहूया... बायडेन २७० चा आकडा कसा पूर्ण करताहेत
- सध्या २५३ मते. आणखी १७ ची गरज.ती या दोन राज्यांतून मिळत आहेत.
अॅरिझोना-११ मते

येथे बायडेन यांना १.६% आघाडी आहे. ९०% मतांची मोजणी झाली. उर्वरित १०% मते टपालाने मिळाली आहेत, ती बहुतांश बायडेन यांची मानली जात आहेत.

नेवाडा-६ मते
येथे बायडेन यांना १.१% ची आघाडी.येथेही ११% मतांची मोजणी बाकी. ही मतेही टपालाने मिळाली. म्हणजे बायडेन यांची आघाडी आणखी मोठी असेल.
त्यामुळे ट्रम्प मतमोजणी रोखण्यावर अडून. त्यांचे समर्थक रस्त्यावर. बायडेन यांचे शांतता राखण्याचे आवाहन.

आता पुढे.. बायडेन यांची ३६ मते या दोन राज्यांत वाढल्याचे दिसतेय
पेन्सिल्व्हेनिया-२० मते
आधी ट्रम्प यांना १८%ची आघाडी, आता बायडेन पुढे

सुरुवातीची ७३% मते मोजल्यानंतर ट्रम्प यांना साडेसात लाख मतांची (१८%) आघाडी. आता ९५% मतमोजणी झाली आहे आणि बायडेन ६,२३८ मतांनी (०.०१%) आघाडीवर. द न्यूयॉर्क टाइम्सनुसार, मतमोजणी पुढे सरकेल तशी बायडेन यांची आघाडी वाढेल.

जॉर्जिया-16 मते
येथे ट्रम्प यांची आघाडी ३७% होती, आता बराेबरीत आहेत

सुरुवातीची ४०% मतमोजणीपर्यंत ट्रम्प ४ लाख (३७%) मतांनी आघाडीवर होते. आता बायडेन १५६३ मतांनी पुढे आहेत. ७५ हजारांवर मतांची मोजणी बाकी आहे. ०.५% अंतर राहिल्यास जॉर्जियाच्या कायद्यानुसार फेरमोजणी होईल. निकाल लांबणीवर पडेल.

....उर्वरित २ राज्ये अलास्का-नॉर्थ कॅरोलिनात ट्रम्प आघाडीवर यात एकूण १८ इलेक्टाेरल व्होट आहेत. येथे ट्रम्प विजयी झाल्यास त्यांचे २३४ व्होट होतील. म्हणजे बहुमतापेक्षा ३६ कमी. मात्र येथेही चुरशीची लढत होत आहे. (दोन्ही राज्यांत बायडेन जिंकल्यास त्यांची एकूण मते ३०६ होतील.)

प्रशासन... सिक्रेट सर्व्हिस एजन्सीनेही आता भावी अध्यक्ष बायडेन यांना दिला सुरक्षेचा वेढा
सोशल मीडिया... भडक विधानांमुळे ट्विटरला सतत डिलीट करावे लागताहेत ट्रम्प यांचे ट्वीट
माध्यमे... खोटे दावे केल्याने एबीसी, एनबीसीसारख्या चॅनल्सनी ट्रम्प यांचे प्रसारण थांबवले
न्यायालय... दोन राज्यांत मतमोजणी तत्काळ थांबवण्याची ट्रम्प यांची मागणी फेटाळली
जनता...व्हाइट हाऊस सोडण्याचा जनतेने दिला ट्रम्प यांना आदेश... आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा