आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:ज्येष्ठ नेत्यांची नव्हती साथ, जनता माफ करणार नाही : ट्रम्प ज्युनियर

वॉशिंग्टन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेमोक्रॅट्सवर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर ट्रम्प यांचा गट आता स्वकीयांना भिडला

अमेरिकेत अजूनही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतचा कल पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना खुर्ची सोडावी लागेल आणि बायडेन नवे राष्ट्राध्यक्ष असतील, असे दिसते. हा निकाल ट्रम्प गटाच्या पचनी पडत नाहीये. ट्रम्प यांनी विरोधी डेमोक्रॅट्सवर घोटाळ्याचे आरोप केले आणि निकालास आव्हान देण्यासाठी कोर्टात आव्हान देऊ, असे म्हटले. दुसरीकडे त्यांच्या मुलांनी आपल्याच रिपब्लिकन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी वडिलांची साथ सोडल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांचे थोरले चिरंजीव ट्रम्प ज्युनियर म्हणाले, निवडणुकीच्या काळात वडिलांना पक्षाकडून बळकट पाठिंबा मिळाला नाही. २०२४ मध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नेत्यांनी वडिलांना मुळीच साथ दिली नाही. ट्रम्प यांचे धाकटे चिरंजीव एरिक ट्रम्प म्हणाले, आमचे मतदार वडिलांना साथ न देणाऱ्या नेत्यांना कधीही माफ करणार नाहीत.

सोशल मीडियातील स्टॉप द स्टील ग्रुप बंद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित खोट्या दाव्यांसंबंधी वक्तव्यांचे प्रसारण करणे थांबवले आहे. परंतु सोशल मीडियावर त्यांचे समर्थक सक्रिय आहेत. त्यांनी स्टॉप द स्टील ग्रुप बनवला. त्याचे २२ तासांत ३.२ लाख सदस्य झाले. मात्र सोशल मीडिया कंपनीने हा ग्रुप बंद केला.

ग्रेटाचा पलटवार..चिल डोनाल्ड, चिल..
ट्रम्प यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्वीडनची तरुण पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गची खिल्ली उडवली होती. पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या लोकांविषयी तेव्हा ग्रेटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर ट्रम्प सोशल मीडियावर म्हणाले होते- ‘हा मूर्खपणा आहे. ग्रेटाने संतापाला आवर कसा घालायचा हे शिकले पाहिजे. त्यानंतर आपल्या मित्रांसोबत जुन्या जमान्यातील चित्रपट पाहिले पाहिजेत. चिल ग्रेटा, चिल.’ या त्यांच्या मल्लिनाथीला आता ग्रेटाने उत्तर दिलेय. ट्रम्प सातत्याने निवडणूक घोटाळ्याचा आरोप करत आहेत. त्याचा संदर्भ देत ग्रेटाने साेशल मीडियावर म्हटले ते असे-‘हा काय मूर्खपणा आहे. डोनाल्ड यांनी संतापाला आवर कसा घालायचा हे शिकले पाहिजे. त्यानंतर मित्रांसोबत जुन्या जमान्यातील चित्रपट पाहिले पाहिजेत. चिल डोनाल्ड, चिल.’

लोकशाही प्रक्रियेकडे ट्रम्प यांनी करू नये दुर्लक्ष
रिपब्लिकन पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी लोकशाही प्रक्रियांकडे दुर्लक्ष करता कामा नये. युटाचे सिनेटर मॅट मोमनी व मेरीलँडचे गव्हर्नर लॅरी होगान यांनी ट्रम्प यांनी निकालाचा सन्मान करण्याचाही सल्ला दिला. ट्रम्प गटाच्या निशाण्यावर संयुक्त राष्ट्राच्या माजी राजदूत निकी हॅलीदेखील आहेत.