आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापोलचा निष्कर्ष:पाहणीतील 40 हजार समीकरणांचा अंदाज : बायडेनच नवे राष्ट्राध्यक्ष शक्य

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांच्या पक्षाला वरिष्ठ, कनिष्ठ सभागृहांत बहुमत कठीण

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवार जो. बायडेन यांच्यात शुक्रवारी शेवटची डिबेट होणार आहे. अंतिम मतदान ३ नोव्हेंबरला होणार आहे. आतापर्यंत बहुतांश पाहण्यांत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. निवडणूकपूर्व चाचणी व पाहणीच्या विश्लेषणानुसार पोल एजन्सी ५३८ च्या पाहणीने एक भविष्यवाणी केली आहे. त्यात बायडेन राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता ८६ टक्के ट्रम्प यांची १२ टक्के आहे, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर बायडेन ३५० इलेक्टोरल मते मिळवून राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता ८५ टक्के आहे. या संस्थेने संपूर्ण देशातील ४० हजारांवर आकड्यांचे समीकरण करून हा दावा केला आहे. २०१६ मध्ये ही केवळ एक एजन्सी होती. तेव्हा अशाच ‌िवश्लेषणाच्या आधारे या संस्थेने ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, अशी भविष्यवाणी केली होती. बायडेन जिंकल्यास असे ११ वर्षांत पहिल्यांदाच घडणार आहे.

बायडेन यांच्या समर्थनार्थ आेबामा, ट्रम्प यांना केले लक्ष्य
आेबामांच्या अपयशामुळे राष्ट्राध्यक्ष झालो : ट्रम्प

आेबामा यांच्या टीकेचा समाचार घेताना ट्रम्प म्हणाले, आेबामा प्रशासन अयशस्वी झालेेले होते. त्यामुळेच वैतागलेल्या लोकांनी मला व्हाइट हाऊसमध्ये पाठवले होते. उत्तर कॅरोलिनाच्या गॅस्टोनिया येथील समर्थकांशी ट्रम्प यांनी संवाद साधला. बायडेन यांच्यासाठी आेबामा प्रचार करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. कुटिल हिलरींसाठी जास्त प्रचार आेबामा यांनीच केला होता. बरोबर आहे ना? ते सगळ्या ठिकाणी होते. ट्रम्प आमचे राष्ट्राध्यक्ष नसतील, असे आेबामा यांनी म्हटले होते. परंतु माझाच विजय झाला.

स्वत:चा बचाव नाही, इतरांना काय वाचवणार? : आेबामा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महामारीचा निपटारा करण्यात चुकीचे व्यवस्थापन केल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प व त्यांच्या टीमला पराभूत करण्याचे आवाहन आेबामा यांनी केले. ते म्हणाले, बायडेन-हॅरिस यांच्याकडे अर्थव्यवस्था व महामारीचा मुकाबला करण्यासाठी योजना आहे. आेबामा म्हणाले, आम्ही आणखी चार वर्षे सहन करू शकत नाही. स्वत:ला वाचवू शकले नाहीत. ते आपल्याला अचानक कशी काय वाचवू शकतील?

सिनेटच्या मंजुरीविना राष्ट्राध्यक्ष काहीही करू शकत नाहीत
एजन्सीच्या म्हणण्यानुसार ट्रम्प जिंकले आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीला बहुमत मिळाले तरी त्यांच्यासमोर अडचणी असतील. सिनेटच्या मंजुरीविना राष्ट्राध्यक्ष टीम निवडू शकत नाहीत. म्हणूनच ट्रम्प यांनी पसंतीची टीम नियुक्तीत अडचणी येऊ शकतात.कोणत्याही कायद्याला मंजुरीसाठी सिनेटची परवानगी अनिवार्य. सिनेटमध्ये डेमोक्रॅटिककडून विधेयके काढून घेणे कठीण होईल. कोणताही सौदा, करार, भागीदारी, लष्करी कारवाईपूर्वी सिनेटची मंजुरी घ्यावी लागते.

राष्ट्राध्यक्ष मिळण्यास विलंब
३ नोव्हेंबरनंतर ८ नोव्हेंबरपर्यंत मतदान मोजणी पूर्ण झाल्यास तसेच यासंबंधी वादंग संपल्यास २० जानेवारीपर्यंत राष्ट्राध्यक्षांची घोषणा होऊ शकेल. मात्र ट्रम्प व बायडेन यांची इलेक्टोरल कॉलेज मते समान राहिल्यास मतदानात घोटाळ्याचा आरोप करून ट्रम्प कोर्टाचे दार ठोठावू शकतात. २० जानेवारीला दुपारपर्यंत शपथ होऊ शकते.