आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिकी निवडणूक:रिपब्लिकन पार्टीचे संमेलन, ट्रम्प यांच्या शिलेदारांचे 20 विधानांपैकी 13 दावे धादांत खोटे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत माइक पेन्स (६१) यांनी उपराष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टीची अधिकृत उमेदवारी स्वीकारली. पेन्स हे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आहेत. पक्षाच्या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात ट्रम्प यांचे वक्ते राष्ट्रीय सुरक्षा केवळ ट्रम्प यांच्यामुळे अबाधित असल्याचे आपल्या भाषणातून पटवून देत होते. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन परराष्ट्र धोरण योग्य पद्धतीने राबवण्यात अपयशी ठरले होते, याची आठवण अनेक वक्त्यांनी करून दिली. पेन्स यांनी बाल्टिमोरच्या मॅकहेन्री फोर्टवर आपले भाषण दिले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ट्रम्प यांच्या वक्त्यांच्या २० विधानांची पडताळणी केली. त्यापैकी १३ खोटे किंवा दिशाभूल करणारे, ४ सत्य, ३ अतिशय चकीत करणारी विधाने त्यात आढळली.

  • माइक पेन्स म्हणाले, दहशतवादी लादेनचा खात्मा करणाऱ्या मोहिमेस बायडेन यांनी विरोध केला होता.

तथ्य : बायडेन यांनी या मोहिमेला विरोध केलेला नव्हता. या मोहिमेसाठी सल्ला देण्यासाठी त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आेबामा यांच्याकडे वेळ मागितला होता. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर कारवाईला पाठिंबा दिला.

  • पेन्स म्हणाले, डेव्ह पॅट्रिक अंडरवूड व गृह विभागातील इतर अधिकाऱ्यांची आेकलँडच्या दंगलीदरम्यान गोळी मारून हत्या करण्यात आली होती.

तथ्य : अंडरवूडची हत्या दंगलीत झाली नव्हती. आरोपी स्टीव्हन कारिलो कट्टरवादी बुगालू गटात होता. पोलिसांची हत्या करण्यासाठी तो आेकलँडला गेला होता. परंतु दंगलीत सामील नव्हता.

  • माइस पेन्स म्हणाले- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नामुळे तीन वर्षांत ९०.३० लाख रोजगार मिळाले.

तथ्य : ही माहिती योग्य नाही. फेब्रुवारी व एप्रिलमध्ये २.२० कोटी लोकांचा रोजगार गेला, हे देखील लक्षात घ्यावे.

  • माइक पेन्स म्हणाले- बायडेन शाळांना निधी देणे बंद करू इच्छितात.

तथ्य : खासगी शाळांना सरसकट निधी देण्याऐवजी चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांचा निधी वाढवावा, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

  • ट्रम्प यांची स्नुषा लारा म्हणाल्या- बायडेन पोलिस निधीत घट करण्याचे समर्थक.

तथ्य : डेमोक्रॅटिक पार्टीच्या काही नेत्यांनी पोलिस निधीत घट करण्याचे समर्थन केले होते. परंतु बायडेन यांनी त्यास सहमती दर्शवली नव्हती. सामाजिक न्याय व्यवस्थेत सुधारणा व्हावी, असे बायडेन म्हणाले होते.

  • राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे माजी संचालक रिचर्ड ग्रेनेल म्हणाले- गेल्या वेळी आेबामा-बायडेन प्रशासनाने ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेची हेरगिरी केली होती.

तथ्य : ट्रम्प यांनी सिनेटला विश्वासात न घेता ग्रेनेल यांची गुप्तचर विभागाचे अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. रशियाच्या निवडणुकीतील हस्तक्षेप प्रकरणात ट्रम्प पीडित असल्याचे ग्रेनेल म्हणाले होते.