आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:‘ट्रम्पना पराभवाची कुणकुण, ते कोर्टात संकटे उभी करतील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या तीन नाेव्हेंबरला काेण कुणाला निवडून देणार आहे...

अमेरिकेवर सध्या दोन पक्षांचे वर्चस्व आहे. २०० वर्षातही तिसरा पक्ष अस्तित्वात न आलेला हा एकमात्र देश आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या पराभवाची जाणीव आहे. यामुळे ते नाहक विधाने करत आहेत. यामुळे ते कोर्टात जाऊ शकतील व यामुळे अमेरिकेतील सर्वात मोठे संकट उभे राहू शकते. हे मत आहे, प्राध्यापक अॅलेक्स केझार यांचे. ते हॉवर्डमध्ये प्राध्यापक आहेत. ते ही निवडणूक प्रक्रिया समजून सांगातहेत...

येत्या तीन नाेव्हेंबरला काेण कुणाला निवडून देणार आहे...
खरी निवडणूक ३ तारखेला शेवटच्या मतदानानंतर सुरू हाेईल. मी ३ तारखेला मतदान केले तेव्हा बायडेन किंवा ट्रम्प यांचे मतदार कोण आहेत हे मला माहीत नव्हते. हे निवडून दिलेले ५३८ मतदार १२ डिसेंबरला राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करतील. ६ जानेवारीला काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात त्याची माेजणी हाेईल. २७० पेक्षा जास्त मते मिळालेल्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष घोषित केले जाईल.

सर्वपक्षीय प्रणाली असूनही दाेनच पक्षांचे अस्तित्व का ?
१७९६ मध्ये प्रथमच राजकीय विचारसरणीची टक्कर झाली. ज्यांना संघीय संरचनेची बाजू होती त्यांना फेडरलिस्ट (आता डेमोक्रॅटिक) आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक (आता रिपब्लिकन) म्हणून आेळखले जाऊ लागले. या निवडणुकीत सर्वाधिक मतदार मते मिळवणारे अध्यक्ष असलेले फेडरलिस्ट जॉन अ‍ॅडम्स आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन थॉमस जेफरसन उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. या दोन विचारसरणींचा प्रसार जसा वाढत गेला तसे लोक एका पक्षाशी निष्ठावान असलेले मतदार म्हणून निवडले गेले.

अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया इतकी किचकट का ?
१७८७ मधील फाउंडिंग फादरच्या प्रणालीअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील लोक मत देऊन आपला उत्कृष्ट नागरिक निवडतील. हे निवडलेले मतदार विद्यमान आणि भविष्यातील स्थिती लक्षात घेऊन सर्वोत्कृष्ट राष्ट्राध्यक्षाची निवड करतील. सर्वोत्कृष्ट नागरिकांच्या या गटाला इलेक्टोरल कॉलेज असे नाव देण्यात आले. पण आज आपण त्यांना ओळखतही नाही.