आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या फ्लोरिडात 12 वर्षांच्या मुलावर हत्येचा आरोप लागला आहे. त्याच्यासोबत एका 17 वर्षांच्या अल्पवयीनावरही हत्येचा आरोप लागला आहे. तर 16 वर्षांच्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 30 मार्चला या तीन आरोपींनी 3 अल्पवयीनांना गोळी मारली होती.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की तिन्ही आरोपी लुटमार करणाऱ्या एका टोळीशी संबंधित होते. तसेच ते तिघेही मारल्या गेलेल्या अल्पवयीनांसोबत एकाच कारमध्ये दिसले होते. मारले गेलेले अल्पवयीन त्यांच्या इच्छेनेच या आरोपींसोबत बसले होते.
आणखी एका आरोपीचा शोध सुरू
पोलिस अधिकारी बिली वूडस म्हणाले - विश्वास बसत नाही की हत्या करणाऱ्या मुलांचे वय इतके कमी आहे. क्रिस्टोफर एटकिन्स तर केवळ 12 वर्षांचा आहे. उर्वरित दोन आरोपी रॉबर्ट रॉबिन्स 17 वर्षे तर ताहज ब्रुटन 16 वर्षांचा आहे. मारले गेलेले अल्पवयीनही लुटमार करणाऱ्या एका टोळीशी संबंधित असल्याचे आम्हाला वाटते.
संशयः मारले गेलेले अल्पवयीन शस्त्र खरेदी करण्यासाठी आले होते
पोलिस अधिकारी वूडस म्हणाले - हत्या कोणत्या हेतूने करण्यात आली ते कळू शकले नाही. प्राथमिक तपासातून दिसते की मारले गेलेले अल्पवयीन शस्त्र खरेदीसाठी आले होते. तथापि, असेही मानले जात आहे की त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला, त्यानंतर याचे पर्यवसान हत्येत झाले. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. यानंतर हत्येचे खरे कारण समोर येईल.
मृतांमध्ये दोन मुली
पोलिस अधिकारी बिली वूडस म्हणाले - मृतांमध्ये 16 वर्षांची लैला सिल्वरनेल आणि 16 वर्षांची केमिली क्वार्ल्स यांचाही समावेश होता. ज्या कारमध्ये हे अल्पवयीन होते, ती लैलाची होती. तिचा मृतदेह 30 मार्च रोजी रस्त्याच्या बाजूला आढळला होता. केमिलीचा मृतदेह कारमध्येच आढळला होता. याशिवाय कारमध्ये आम्हाला 17 वर्षांच्या एका मुलाचा मृतदेहही आढळला होता. त्याची ओळख पटली नाही.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.