आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US Latest News And Update I 5 Killed, 18 Seriously Injured I Attacked By A Twenty two year old Youth

अमेरिकेच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार:5 ठार, 18 गंभीर जखमी; हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय तरूणाला अटक

कोलोरॅडो स्प्रिंग्स I अमेरिका14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील एका गे नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री एका 22 वर्षीय तरूणाने गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 5 जण ठार झाले असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या हल्लेखोरास अटक केली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी क्लबमधून दोन गन जप्त केल्या आल्या आहेत. असे पोलिस अधिकारी एड्रियन वास्क्वेझ यांनी माध्यमांना सांगितले.

एल पासो काउंटी डिस्ट्रिक्ट अ‌ॅटर्नी मायकेल अ‌ॅलन यांनी सांगितले की, तपास अधिकारी या हल्लामागील कारणे शोधण्याचे काम करित आहेत. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारानंतर क्लब क्यूमधून दोन बंदुक जप्त करण्यात आल्या आहेत. हल्ला करणाऱ्या तरूणाचे नाव अ‌ॅंडरसन ली आल्ड्रिच असे आहे. ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.

रात्री बारा वाजेच्या सुमारास माहिती मिळाली

पोलिस अधिकारी एड्रियन वास्क्वेझ म्हणाले की, शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास 'क्लब क्यू' मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिस घटनास्थळाकडे पळाले. किमान दोन धाडसी माणसांनी हल्लेखोर तरूणाचा सामना केला. त्याला गोळीबार करण्यापासून रोखले. पोलिसांनी त्या धाडसी युवकांचे पोलिस प्रशासनाने कौतुक केले आहे.

18 जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक

18 जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर मयतांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जात आहेत. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही जखमींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

बातम्या आणखी आहेत...