आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेक्सासमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या नऊ जणांमध्ये एका भारतीय वंशाच्या महिला इंजिनिअरचा समावेश आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या थाटीकोंडा असे या इंजिनिअरचे नाव आहे. ती प्रकल्प व्यवस्थापक म्हणून एका खाजगी कंपनीशी संबंधित होती. ज्यावेळी हल्लेखोराने गोळीबार केला, त्यावेळी ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींसोबत मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेली होती.
ऐश्वर्याचे कुटुंब हैदराबादचे आहे. त्यांनी एएनआयला सांगितले की, ऐश्वर्याच्या मित्रांनाही गोळ्या लागल्या आहेत. मात्र, ते आता धोक्याबाहेर आहेत. कुटुंबीय आता ऐश्वर्याचा मृतदेह भारतात परत आणण्याच्या तयारीत आहेत.
बंदूकधारी नाझी समर्थक होता
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, 8 जणांची हत्या करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. मोर्सिओ गार्सिया असे त्याचे नाव सांगितले जात आहे. त्याच्या कपड्यांवरील बिल्ल्यावरून त्याला नाझी समर्थक म्हटले जात आहे.
त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा वर्णद्वेषाच्या दृष्टीनेही तपास करत आहेत. हल्लेखोराकडे अनेक प्रकारची शस्त्रे असल्याचे तपासात समोर आले आहे. हल्ल्यात वापरलेल्या बंदुकीशिवाय त्याच्याकडे आणखी 5 बंदुका होत्या.
बायडेन म्हणाले - सामूहिक गोळीबारामुळे देशाचा नाश होत आहे
टेक्सास गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, सामूहिक गोळीबारामुळे आपला देश उद्ध्वस्त होत आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी पक्षांना बंदूक नियंत्रणाबाबत कायदा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
घटनेच्या वेळी उपस्थित महिलेने सांगितले की, हल्लेखोराने सुमारे 50 ते 60 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत.
अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आणि 40 कोटी बंदूकी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.