आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेने आता तिबेटच्या आडून चीनला धडा शिकवण्याची याेजना बनवली आहे. त्याचा भाग म्हणून अमेरिकेने आधी राॅबर्ट ए डेस्ट्राॅ यांना विशेष समन्वयकपदी नियुक्त केले. त्याच्या चाेवीस तासांत तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख लाेबसाँग सांगेय यांनी डेस्ट्राॅ यांची भेट घेतली. गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेने तिबेटच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांना निमंत्रण देऊन त्यांच्यासाेबत चर्चाही केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाॅम्पियाे यांनी बुधवारी डेस्ट्राॅला तिबेटच्या प्रकरणात विशेष समन्वयक बनवले हाेते. पाॅम्पियाे म्हणाले, डेस्ट्राॅ चीन सरकार व दलाई लामा यांच्यातील संवादाला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी अमेरिकेच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतील. आमचा उद्देश तिबेटच्या सांस्कृतिक व भाषिक आेळखीचे संरक्षण करणे असा आहे.
आमच्यासाठी एेतिहासिक क्षण : सांगेय
सांगेय-डेस्ट्राॅ यांच्यात चर्चा : सांगेय व डेस्ट्राॅ यांच्यातील चर्चेनंतर डेस्ट्राॅ म्हणाले, आमच्यासाठी हा गाैरवाचा व एेतिहासिक क्षण आहे. आमची चर्चा सकारात्मक राहिली. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाआे लिजियान म्हणाले, तिबेटला शस्त्र बनवून अमेरिका आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने हे काम बंद करावे.
कठोर : प्रशासनाने चीनवर सर्वाधिक नियंत्रण ठेवले : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कॅराेलिनाच्या एका कार्यक्रमात चीनबाबत कडक भूमिका घेतली. सध्या अमेरिकेचे प्रशासन चीनवर प्रचंड नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे. तसे आतापर्यंत कधीही घडले नव्हते. चीन आमच्या नागरिकांचा राेजगार हिरावून घेत हाेता. त्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहाेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
हतबलता : हाँगकाँग आंदाेलकांना कॅनडात आश्रय, त्यांना राेखा : चीन
कॅनडात हाँगकाँगच्या आंदाेलकांना आश्रय दिल्यावरूनदेखील चीन भडकला आहे. कॅनडातील चीनचे राजदूत काेंग पियू म्हणाले, कॅनडाने हाँगकाँगच्या निदर्शकांना आश्रय देऊ नये. ते हिंसक गुन्हेगार आहेत. त्यांना आश्रय देणे म्हणजे चीनच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. हाँगकाँगमध्ये कॅनडाचा पासपाेर्ट बाळगणारे तीन लाखांहून जास्त लाेक आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.