आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धाचा धुरळा अद्याप खाली बसला नसताना आता युक्रेन लष्कराशी संबंधित अमेरिका व नाटोचे क्लासिफाईड वॉर डॉक्यूमेंट्स नुकतेच सोशल मीडियावर लीक झालेत. बायडेन सरकारने ही माहिती दिली. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हा वॉर प्लॅन ट्विटर व टेलिग्रामवर लीक झाला. या प्लॅटफॉर्मचे अर्धा अब्जाहून अधिक यूजर्स रशियन आहेत. त्यामुळे पेंटागॉनने या लीकची चौकशी सुरू केली आहे.
हे डॉक्यूमेंट्स सोशल मीडियावर कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्या सर्रासपणे रशियाच्या सरकारी मीडिया चॅनेलवर दाखवल्या जात आहेत. अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या मते, लीक झाल्यानंतर मूळ दस्तावेजांत विविध बदल दिसून आले. यात युद्धात मारल्या गेलेल्या युक्रेनच्या नागरिकांचा आकडा वाढवून दाखवण्यात आला, तर रशियन सैनिकांचा आकडा कमी करण्यात आला.
लीकनंतर डॉक्यूमेंट्सच्या डेटात बदल
तज्ज्ञांच्या मते, या बदलांमुळे रशिया चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ओरिजनल डॉक्यूमेंटमध्ये वेपन डिलिव्हरी, लष्करी ताकद व इतर गुप्तहेर माहितीशी संबंधित फोटो लीक झाल्यामुळे अमेरिकन गुप्तहेर विभागातील सुरक्षा यंत्रणेतील मोठी त्रुटी उजागर होते.
बायडेन सरकार सातत्याने हे डॉक्यूमेंट्स डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण गुरुवार सायंकाळपर्यंत त्यांना यात यश आले नव्हते.
पुढील महिन्यात जारी होणार युक्रेन हल्ल्याचा प्लॅन
दस्तावेजांत एक्झॅक्ट बॅटल प्लॅन्सची कोणतीही माहिती नव्हती. उदाहरणार्थ युक्रेन केव्हा, कसा व कुठे हल्ला करणार. अमेरिकन अधिकाऱ्यांचा यासंबंधीचा प्लॅन पुढील महिन्यात जारी होणार होता. लीक झालेले डॉक्यूमेंट्स 5 आठवडे जुने आहेत. त्यात 1 मार्चपर्यंतच्या युद्धासंबंधीचा अमेरिकन व युक्रेनचा दृष्टिकोन व आगामी काळातील सैनिकांच्या भरतीच्या डेटाचा समावेश होता.
रशियाला कळू शकते वेपन डिलीव्हरीची टाइमलाइन
तज्ज्ञांच्या मते, या दस्तावेजांतील काही भाग विश्वासार्ह होते. त्यामुळे रशियाला शस्त्र व सैनिकांच्या डिलीव्हरीशी संबंधित टाइमलाइन समजू शकते. एवढेच नाही तर युक्रेनच्या सैनिकांची संख्या व इतर लष्करी माहितीही त्यांच्या हाती सापडू शकते. याशिवाय काही डॉक्यूमेंट्समध्ये युक्रेनचे लष्कर, त्यांची उपकरणे व जानेवारी ते एप्रिलपर्यंत होणाऱ्या प्रशिक्षणाची लिस्टचाही समावेश होता. त्यात 12 लढाऊ ब्रिगेड्सचीही माहिती होती. त्यात 9 ची ट्रेनिंग सुरू झाली आहे. युक्रेनी ब्रिगेडमध्ये जवळपास 4 ते 5 हजार सैनिक असतात.
युक्रेन -अमेरिकेतील गुप्तचर माहिती शेअर करण्याची प्रक्रिया गत काही काळापासून रोडावली आहे. युक्रेनकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या रणनीतीवर दोन्ही देश मिळून काम करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.