आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शन आटोपताच वधुचा भीषण अपघातात मृत्यू:अमेरिकेतील घटना, रिसेप्शन डेस्टिनेशनबाहेर कारने दिली धडक, वर गंभीर जखमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या रिसेप्शननंतर बाहेर पडताच एका कारने दिलेल्या धडकेत वधुचा मृत्यू तर वर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना प्रांतात घडली आहे.

सामंथा हचिन्सन असे मृत्यूमुखी पडलेल्या वधुचे नाव असून जखमी वराचे नाव एरिक असे आहे. लग्नाच्या रिसेप्शननंतर हे दोघेही रिसेप्शन डेस्टिनेशनच्या बाहेर येऊन कारमध्ये बसले होते. त्यांची कार सुरू व्हायच्या आतच दुसरीकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नवविवाहित दाम्पत्याची कार बरेच अंतर फरफटत गेली. या भीषण अपघातात सामंथाचा जागीच मृत्यू झाला तर एरिक गंभीर जखमी झाला.

धडक देणाऱ्या कारची चालक नशेत बेधुंद अवस्थेत होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. ही घटना 30 एप्रिल रोजीची असल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातात एरिकसह त्याचा एक मित्रही गंभीर जखमी झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देणाऱ्या कारच्या चालकाचे नाव जेमी कोमोरोस्की असे असून सध्या ती अटकेत आहे.