आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणूचा सामना करण्याचे लॉकडाऊन हेच साधन आहे, असे बहुतांश देशांना वाटते. मात्र अमेरिकेतील मिशिगन प्रांतात गुरुवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी लॉकडाऊनला विरोध केला. मिशिगन कॉन्झर्व्हेटिव्ह कॉलिशनने लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. संघटनेने या निदर्शनाला ऑपरेशन ग्रिडलॉक असे नाव दिले आहे. वास्तविक मिशिगनचे राज्यपाल ग्रेचेन व्हिमर यांनी लोकांना ३० एप्रिल पर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर दुकाने, कारखाने इत्यादीही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावरून लोकांमध्ये संताप आहे. ‘गव्हर्नर व्हिमर आम्ही कैदी नाहीत. मिशिगनची जनता घरात थांबण्याच्या आदेशाला जुमानणार नाही’, असे फलक लोकांनी झळकावले होते. व्हिमर यांनी माध्यमांत प्रतिक्रिया दिली. या रॅलीने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मिशिगनमध्ये आतापर्यंत २८ हजार ५९ रुग्ण आढळले आहेत. पैकी १ हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिको : कामगारांनी क्वाॅरंटाइनची केली मागणी
मेक्सिकोमध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या निर्मात्या कंपन्यातील कामगारांनी लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कारखान्यात काम करू शकत नाहीत. आम्हाला क्वाॅरंटाइन करा, अशी मागणी त्यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.