आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘पिलोमॅन’ आणणार कोरोनावर रामबाण बुटी, मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनीही समर्थन दिल्याने अमेरिकी संतप्त

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • खोट्या दाव्यामुळे पिलोमॅनला 7.5 कोटी रु.चा दंड द्यावा लागला होता

काेरोनाच्या उपचारांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका औषधाला प्रोत्साहन देऊ इच्छितात. पण त्याला ना वैज्ञानिक आधार आहे ना त्याचा चाचणी अहवाल आहे. हे औषध प्रस्तावित करणारे व्यावसायिक आहेत माइक लिंडेल. ते ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असून अमेरिकेत ‘पिलोमॅन’ नावाने प्रख्यात आहेत.

लिंडेल यांचे औषध डाएट्री सप्लिमेंट किंवा कोरोनावरील उपचार म्हणून मंजूर केले जावे यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अन्न आणि औषध प्रशासनावर दबाव टाकत आहेत. ते उपचारात प्रभावी ठरेल की नाही याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा लिंडेल यांच्याकडे नाही. हे औषध पिवळ्या कण्हेराच्या रोपापासून बनवले आहे. निवडणूक काळात ट्रम्प यांनी त्याला समर्थन दिल्याने अमेरिकेत विरोध सुरू झाला आहे. व्हाइट हाऊसच्या सूत्रांनुसार, जुलैत पिलोमॅन लिंडेल व नागरी गृहनिर्माण विकासचे सचिव बेन कार्सन यांच्यासोबत ट्रम्प यांची बैठक झाली होती, तीत त्यांनी ऑलिएंड्रीन या औषधाची माहिती दिली. लिंडेल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एफडीएने त्याला मंजुरी द्यायला हवी, ते उपयुक्त आहे, असे ट्रम्प यांनी बैठकीनंतर सांगितले. एफडीएने त्याआधी कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरही बंदी घातली होती, पण ट्रम्प स्वत: ते घेत होते. त्याच्या वापराने हृदयरोगांचा धोका आहे, असे एफडीएचे म्हणणे होते. पिलोमॅन यांनी बनवलेल्या औषधाच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, ‘अशा जडीबुटीला प्रोत्साहित करण्याच्या प्रवृत्तीमुळे अमेरिकींना धोका होऊ शकतो,’ अशा शब्दांत व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...