आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचा तैवानजवळील युद्ध सराव संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि फिलिपिन्सने आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्ध सराव सुरू केला आहे. वृत्तांनुसार, या युद्ध सरावात दक्षिण चीन समुद्रात बुडालेल्या एका जहाजावर लाइव्ह फायरिंगचा सरावही केला जाईल.
युद्ध सरावात 17 हजार सैनिक सहभागी होतील. यात 12,200 अमेरिकेचे आणि 5,400 सैनिक फिलिपिन्सचे असतील. या युद्ध सरावाला बालिकतान नाव देण्यात आले आहे. फिलिफिन्सच्या भाषेत याचा अर्थ खांद्याला खांदा लावून चालणे असा होतो. हा सराव 28 एप्रिलपर्यंत चालेल.
तैवानपासून 300 किमी अंतरावर होईल सराव
फिलिपिन्सच्या ज्या लुझोन आयलँडवर हा सराव होत आहे ते तैवानपासून केवळ 300 किलोमीटर अंतरावर आहे. बालिकतानवर बोलताना लेफ्टनंट कर्नल डॅनिएल हुवानेंनी म्हटले की यामुळे दोन्ही सैन्याला आपली युद्ध सज्जता आणि लष्करी तंत्रज्ञान दाखवण्याची संधी मिळेल.
हा युद्ध सराव देशाच्या सुरक्षेसाठई महत्वाचा असल्याचे फिलिपिन्सकडून सांगितले जात आहे. तर फिलिपिन्समधील कम्युनिस्ट पक्षाने या सरावाविरोधात अमेरिकेच्या दुतावासासमोर आंदोलन केले आहे. या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमेरिका पॅट्रिएट क्षेपणास्त्रांचा वापर करणार
फ्रान्स 24 च्या वृत्तानुसार, अमेरिका फिलिपिन्स सरावादरम्यान पॅट्रिएट क्षेपणास्त्र आणि हिमरास रॉकेट प्रणालीचाही वापर करणार आहे. आधी दोन्ही देशांचे सैन्य तैवान आणि दक्षिणेकडील टोकावरून 355 किलोमीटर अंतरावर लाइव्ह फायरिंग करणार होते. ते नंतर बदलण्यात आले.
लाइव्ह फायरिंगसाठी आता स्कारबोरो शोल नावाची 300 किलोमीटर अंतरावरील जागा निवडण्यात आली आहे. वास्तविक, फिलिपिन्सच्या स्कारबोरो शोलवर 2012 मध्ये चीनने कब्जा केला होता. याविरोधात फिलिपिन्सने द हेग न्यायालयाचे दार ठोठावले होते. कोर्टाने फिलिपिन्सच्या बाजूने निर्णय दिला होता. चीनने हा निर्णय मान्य करण्यास नकार दिला होता.
तैवानजवळ अजूनही चीनची युद्ध विमाने उपस्थित
तैवान लष्कराचे म्हणणे आहे की, युद्ध सराव संपल्यानंतरही चीनची युद्ध विमाने तैवानजवळ उपस्थित आहेत. मंगळवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची 91 विमाने, 12 जहाज ट्रॅक करण्यात आले. यापैकी 54 विमाने तर तैवानच्या मीडियन लाइनमध्येही घुसली.
चीनची ही कृती बेजबाबदार असल्याची टीका तैवानच्या राष्ट्रपतींनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.