आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्रम्प व मेलानियांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
ट्रम्प यांनी लिहिले की, माझा आणि मेलानियाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही त्वरित क्वॉरंटाइन आणि रिकव्हरी प्रकिया सुरू करू. आम्ही एकजुटीने याचा सामना करू. यापूर्वी ट्रम्प यांच्या खासगी सल्लागार होप हिस्क यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ३१ वर्षीय हिक्सनी बुधवारी प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यासोबत प्रवास केला होता. त्या गुरुवारी पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मेलानियांनी खबरदारी म्हणून क्वॉरंटाइन होत चाचणी केली होती.
Tonight, @FLOTUS and I tested positive for COVID-19. We will begin our quarantine and recovery process immediately. We will get through this TOGETHER!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
दरम्यान, ७१ वर्षीय ट्रम्प यांचे वजन १२२ किलोग्रॅम असून तज्ज्ञांच्या मते या दोन्ही बाबी घातक आहेत. ७० पेक्षा जास्त वय आणि अतिलठ्ठ लोकांसाठी गंभीररीत्या आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. तसेच ट्रम्प यांना आधीपासूनच इतर दोन व्याधी भेडसावत असल्याने धोका आणखी वाढला आहे. दुसरीकडे कोरोनाची लागण झालेले ट्रम्प हे पहिलेच जागतिक नेते नाहीत. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सनारोही बाधित झाले होते. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना केली आहे. मात्र, यासाठी ट्रम्प यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे काहींनी म्हटले आहे.
दूसऱ्या डिबेटमध्ये सहभाग घेणे कठीण
दूसरी प्रेसिडेंशियल डिबेट 15 अक्टोबरला होणार आहे. म्हणजे केवळ 13 दिवस शिल्लक आहेत. क्वारंटाइन पीरेड 14 दिवसांचा असतो. यानंतरही टेस्ट केली जाईल. यामुळे ट्रम्प या डिबेटमध्ये सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे.
मास्कची उडवली होती थट्टा :
ट्रम्प अनेकदा विनामास्क दिसून आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी ते केवळ दोनदा मास्क लावलेले दिसून आले. त्यांनी अनेकदा मास्कची थट्टाही उडवली आहे. लसीपेक्षा मास्क महत्त्वाचा आहे, याच्याशी मी असहमत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच गत आठवड्यात एका सभेत विरोधी उमेदवार जो बायडेन यांच्या मास्क घालण्यावर त्यांनी टीका केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.