आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटॉकविरोधात ट्रम्प कठोर:टिकटॉक विरुद्ध फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात मोहिम चालवत आहेत डोनाल्ड ट्रम्प, चीनी अॅप्स बॅन करण्यासाठी अमेरिकेने केले भारताचे कौतुक

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत टिकटॉक बंद करण्याचा दिला आहे इशारा
  • अमेरिकेचे एनएसए आणि परराष्ट्र मंत्र्यांनी भारतात चीनच्या 59 अॅपवर बंदी घातल्याचे केले होते कौतुक

टिकटॉकवरील बंदीबाबत अमेरिका लवकरच निर्णय घेऊ शकेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्याविरूद्ध जाहिरात मोहीम चालवत आहेत. असे म्हटले जात आहे की हे चिनी अॅप अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करीत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंद घालण्याचा इशारा दिला होता. गेल्या महिन्यात भारताने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती. अमेरिकेच्या एनएसए रॉबर्ट ओ ब्रायन आणि परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या कठोर पाऊलांचे कौतुक केले आहे.

ट्रम्प यांच्या जाहिरात मोहिमेमध्ये काय

न्यूयॉर्क टाईम्सचे रिपोर्टर टेलर लॉरेन्झ यांनी पहिल्यांदा ट्रम्प यांच्या टीटीकॉकविरोधी मोहिमेविषयी माहिती आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली. मोहिमेची टॅगलाइन आहे - टिकटॉक तुमची हेरगिरी करत आहे. यात पुढे म्हटले आहे की अमेरिकन नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार आहे.

एका दगडाने दोन पक्षी मारणे

जेव्हा यूजर या जाहिरातीच्या लिंकवर भेट देतो तेव्हा तेथे सर्वेक्षण देखील केले जाते. यामध्ये विचारण्यात आले आहे की, - अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालावी असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाबरोबरच वापरकर्त्यांना ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी देणगी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

हा देणगीसाठी खेळ आहे का?

अमेरिकन वेबसाइट मशाबेलच्या म्हणण्यानुसार, टिकटॉक ही एक नवीन सोशल मीडिया कंपनी आहे ज्याद्वारे ट्रम्प यांना देणगी मिळवायची आहेत यापूर्वी स्नॅपचॅट आणि ट्विटरवर आरोप केला गेला होता की 2020 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ती हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वीच सोशल मीडिया कंपन्या या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या निशाण्यावर आहे.

मग, टिकटॉकच्या बाबतीत नवीन काय आहे?

टिकटॉकच्या प्रकरणाकडे तज्ञ वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात, कारण केवळ अमेरिका किंवा भारतच नाही, तर जगातील बऱ्यात देशांत चीन टिकीटॉकच्या माध्यमातून या देशांची हेरगिरी करीत असल्याचा संशय आणि शंका वाढत आहे. म्हणूनच याला राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. असे म्हटले जात आहे की टिकटॉक किंवा अन्य चिनी अॅप हे वापरकर्त्यांचा डेटा चीनमध्ये पाठवत आहे आणि यामुळे राष्ट्रीय सुरक्षेस मोठा धोका आहे.

टिकटॉक सत्य लपवत आहे

जेव्हा या अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली होती, तेव्हा कंपनीने सांगितले की ते युजरचा डेटा शेअर करत नाही, परंतु माशाबेलच्या अहवालातील दावे पूर्णपणे विरुद्ध आहेत. यानुसार अमेरिकेतील टिकटॉक ऑपरेटरनी सांगितले की ते इतर कोणाबरोबरही यूजर डेटा शेअर करत नाहीत आणि तसे करण्यास सांगितले गेले आहे. दुसरीकडे, 2017 चा चीनच्या कायद्यात म्हटले आहे की, जर चीनी सरकारची इच्छा असेल तर ते राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता या कंपन्यांकडून यूजर डाटा घेण्यास सांगू शकते. म्हणजेच टिकटॉक दोन बाजूंनी बोलत आहे. 

बातम्या आणखी आहेत...