आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US President Donald Trump | Trump's Farewell Address, Joe Biden, President Elect Biden, Capitol Hill Riots, Inauguration Day, Inauguration Day 2021

US प्रेसिडेंटचे शेवटचे भाषण:​​​​​​​ट्रम्प म्हणाले - 'कोणत्याही युद्धाशिवाय दशकातील पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याचा अभिमान, नवीन सरकारला शुभेच्छा'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडेन-कमला यांची श्रद्धांजली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज समाप्त होत आहे. काही तासांनंतर प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन US चे नवीन राष्ट्राध्यक्ष बनतील. यापूर्वी ट्रम्प यांनी मंगळवारी आपल्या शेवटच्या भाषणात आपल्या सरकारच्या कार्यांचा पाठा वाचला आणि नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या.

यावेळी ट्रम्प म्हणाले की कोणत्याही युद्धाविना दशकातला पहिला राष्ट्राध्यक्ष असल्याचा मला अभिमान आहे. ते म्हणाले की आम्ही अमेरिकेची ताकद घरीच स्थापित केली आणि अमेरिकन नेतृत्वाला बाहेरूनही नवीन उंचीवर नेले. आम्ही चीनविरूद्ध जगाला एकत्र केले, यापूर्वी असे कधी झाले नव्हते.

ट्रम्प यांच्या भाषणातील 5 गोष्टी
1. कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसक हल्ल्यांचा निषेध

19 मिनिटांच्या प्री-रिकॉर्डेड व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी 6 जानेवारीला कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसेचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, अमेरिका अविश्वसनीय, सभ्य, विश्वासार्ह आणि शांतप्रिय लोकांचा देश आहे. येथे सर्वांना वाटते की, आपला देश पुढे जावा आणि नवीन उंची गाठावी.

2. कार्यकाळाचे स्मरण केले
आपला कार्यकाळ आठवताना ट्रम्प म्हणाले की 4 वर्षांपूर्वी आम्ही आपल्या देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी, याची भावना पुन्हा रिन्यू करण्यासाठी आणि जनतेप्रती सरकारची निष्ठा बहाल करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू केली होती. 2016 मध्ये त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले. हा सन्मान शब्दांत व्यक्त करता येत नाही, असे ते म्हणाले.

3. आपल्या कामाचा पाढा वाचला
आम्ही सर्वांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी एक मिशन सुरू केले. आम्ही जगातील इतिहिसाता सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. त्यांनी ऐतिहासिक मिडल ईस्टमध्ये अब्राहम अकॉर्ड यांचाही उल्लेख केला.

4. चीन आणि कोरोनाचाही उल्लेख
आम्ही चीनवर ऐतिहासिक शुल्क लादले. चीनबरोबर एक मोठा करार केला, परंतु शाई कोरडी होण्यापूर्वी आपल्याला आणि संपूर्ण जगाला चीनी विषाणूची लागण झाली. आमचे व्यावसायिक संबंध वेगाने बदलत होते. अमेरिकेत कोट्यवधी आणि कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती, परंतु विषाणूमुळे आम्हाला वेगळ्या दिशेने जाण्यास भाग पाडले गेले.

5. मेलानिया आणि कुटुंबाचे आभार
मी बायडेन प्रशासनाच्या यशासाठीही शुभेच्छा देतो. नवीन प्रशासनाचे स्वागत आहे आणि अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रार्थना करतो. फेयरवेल स्पीचमध्ये ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया आणइ कुटुंबाचे आभार मानले. यासोबतच त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांचेही आभार मानले.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडेन-कमला यांची श्रद्धांजली
कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या अमेरिकन लोकांना बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांनी श्रध्दांजली वाहिली. लिंकन मेमोरियलवर आयोजित कार्यक्रमात बायडेन म्हणाले की, अनेक वेळा या गोष्टी आठवणे कठीण असते, मात्र यामुळे जखमा भरतात. एक राष्ट्र म्हणून हे करणे आवश्यक आहे. यामुळेच आपण येथे आहोत.

बातम्या आणखी आहेत...