आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर आता कायमची बंदी:संसदेतील हिंसाचाराबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर कारवाई, ट्रम्प म्हणाले - आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन संसदेच्या आत आणि बाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारादरम्यान ट्विटरने ट्रम्प यांचे ऑफिशियल अकाउंट कायमसाठी ब्लॉक केलेआहे. यानंतर ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत अकाउंट @POTUS वरून एक पोस्ट केली होती. मात्र ट्विटरने काही सेकंदातच ही पोस्ट डिलीट केली.

या अधिकृत अकाउंटवरून ट्रम्प यांनी लिहिले होते की, 'आम्ही भविष्यात नवीन प्लॅटफॉर्म तयार करू. आमचा आवाज दडपला जाऊ शकत नाही. ट्विटर आमचे अधिकार दडपत आहे. ट्विटरने डेमोक्रॅट सोबत मिळून ट्विटर वरून माझे अकाउंट काढून टाकले. 7 कोटी 50 लाख लोकांचे आवाज दाबले जाऊ शकत नाहीत.'

यामुळे ट्विटरने घेतला निर्णय

ट्विटरने ट्रम्प यांचे पर्सनल अकाउंट कायमचे निलंबित केले आहे. भविष्यात हिंसाचाराचा धोका पाहता हा निर्णय घेतल्याचे ट्विटरने सांगितले. ट्विटरने म्हटले की, 'ट्रम्प यांच्या अकाउंटवरील पोस्टचा अलिकडेच आढावा घेतला. यानंतर धोक पाहता आम्ही त्यांचे अकाउंट निलंबित करण्याचा निर्णय घेतला.' दरम्यान जर ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडले तर त्यांचे खाते कायमचे बंद केले जाऊ शकते, असा इशाराही ट्विटरने याआधी दिला होता.

ट्रम्प यांच्या व्हिडिओमुळे हिंसाचार भडकण्याची भीती : फेसबुक

फेसबुकने ट्रम्प यांचे FB आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन आठवड्यांची बंदी घातली होती. ट्रम्प यांचा एक व्हिडिओ वादग्रस्त असल्याचे फेसबुकने म्हटले होते. फेसबुकचे फेसबुकचे उपाध्यक्ष (इंटेग्रिटी) ग्यू रोजेन म्हणाले की ही आपत्कालीन परिस्थिती आहे, ट्रम्पचा व्हिडिओ हिंसा भडकवू शकतो.

इन्स्टाग्रामने देखील ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले

ट्रम्प म्हणाले होते - निवडणुकीत फसवणूक झाली

कॅपिटल हिलमधील हिंसाचारानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ते समर्थकांना म्हणाले की, आपण दुखी आहात हे मला माहीत आहे. आपल्याकडून निवडणूक काढून घेण्यात आली. यावेळी निवडणुकीत फसवणूक झाली आहे. मात्र आपण त्यांच्यासोबत नाही खेळू शकत. आपल्याला शांतता ठेवायची आहे, तुम्ही घरी परत जा.

बातम्या आणखी आहेत...