आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • US President Joe Biden 5 Big Decision| Necessary To Wear Mask, US Again Join Paris Agreement And WHO; 7 Muslim Countries US Entry Ban Lifted

राष्ट्राध्यक्ष बनताच बायडेन यांचे मोठे निर्णय:मास्क घालणे केले अनिवार्य, US पॅरिस करारात सामिल; 7 मुस्लीम देशांवरुन ट्रॅव्हल बॅन हटवले

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राष्ट्राध्यक्ष बनताच बायडेन यांचे 6 मोठे निर्णय

जो बायडेन बुधवारी (20 जानेवारी) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले. राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्याच्या काही तासांनंतरच बायडेन हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी तात्काळ 17 एग्जीक्यूटिव्ह ऑर्डर्सवर सही केली. सर्वात पहिले त्यांनी मास्क घालणे अनिवार्य करणाऱ्या ऑर्डरवर सही केली.

पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष कार्यालयात (ओवल ऑफिस) पोहोचून बायडेन मीडियाला म्हणाले, 'मला अनेक कामे करायची आहेत, यामुळेच मी येथे आहे. मला वाटते की, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. वेळ वाया घातला जाऊ शकत नाही. तात्काळ कामे सुरू करत आहे. मी यापूर्वीच सांगितले आहे की, पुढच्या 7 दिवसांमध्ये अनेक एग्जीक्यूटिव्ह ऑर्डरवर सही करेल.'

राष्ट्राध्यक्ष बनताच बायडेन यांचे 6 मोठे निर्णय

 • सर्वात पहिले बायडेन यांनी कोरोना व्हायरसविषयी ऑर्डह साइन केली. यानुसार मास्कला फेडरल प्रॉपर्टी घोषित करण्यात आले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने महामारीदरम्यान मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही सरकारी बिल्डिंगमध्ये आहात, किंवा कोरोना हेल्थवर्कर आहात तर सोशल डिस्टेंसिंग ठेवणे आवश्यक असेल. ट्रम्प यांनी मास्कविषयी सख्ती केली नव्हती.
 • 7 मुस्लिम देश - इराक, ईरान, लीबिया, सोमालिया, सूडान, सीरिया आणि यमनवर लावण्यात आलेले ट्रॅव्हल बॅन हटवण्यात आले. ट्रम्प यांनी 2017 मध्ये हे बॅन आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात लावले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले होते. जे 2018 मध्ये कोर्टाने कायम ठेवले होते.
 • आता अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य होईल. बायडेन यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये म्हटले होते की जर अमेरिकेने जागतिक आरोग्य बळकट केली तर ते स्वतःही सुरक्षित राहतील. राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पहिल्याच दिवशी मी अमेरिकेला WHO मध्ये परत आणीन. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी अमेरिकेला WHO मधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.
 • अमेरिका आता पॅरिस करारामध्ये पुन्हा सामील होईल. ट्रम्प यांनी 2019 मध्ये या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की भारत, चीन आणि रशिया अंधाधुंध प्रदूषण वाढवित आहेत. तसेच अमेरिका या प्रकरणात एक चांगले काम करत आहे. ते म्हणाले होते की, या करारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिका 70 वर्षात प्रथमच तेल आणि नैसर्गिक वायूचा नंबर वन उत्पादक देश बनला आहे.
 • बायडेन यांनी मेक्सिको बॉर्डरच्या फंडिंगवरही बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी मॅक्सिकोमधून येणारे प्रवासी पाहता भिंत बनवण्याला नॅशनल इमरजेंसी सांगितले होते.
 • अमेरिकेने सध्या कॅनडाबरोबर वादग्रस्त कीस्टोन XL पाइपलाइन करारावर स्थगिती दिली आहे. बायडेन यांच्या निर्णयाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निराशा व्यक्त केली. 2019 मध्ये ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर 1900 किमी लांबीची तेल पाइपलाइन तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. बराक ओबामा प्रशासनानेही पर्यावरण गटांचा विरोध लक्षात घेता या पाइपलाइनच्या बांधकामाला बंदी घातली होती. पर्यावरणीय गटांचा असा आरोप आहे की पाइपलाइनद्वारे कच्चे तेल काढल्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन 17% जास्त होईल.
बातम्या आणखी आहेत...