आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. डेलावेअरच्या रेहोबोथ परिसरात एक छोटे खासगी विमान अचानक नो-फ्लाय झोनमध्ये घुसले. बायडेन पत्नी जिल यांच्यासोबत सुट्टी घालवण्यासाठी येथे आले होते. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले. जो बायडेन यांना तात्काळ त्यांच्या पत्नीसह सेफ हाऊसमध्ये पाठवण्यात आले आहे.
बायडेन कुटुंबाला कोणतीही हानी नाही
व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घटनेच्या वेळी बायडेन आपल्या पत्नीसोबत डेलावेरच्या व्हेकेशन होममध्ये होते. या विमानाने व्हेकेशन होमवरून हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. मात्र, विमानामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही. सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, विमान तात्काळ बाहेर काढण्यात आले असून पायलटची चौकशी सुरू आहे.
विमान प्रॉपर रेडिओ चॅनेलवर नव्हते
CBS न्यूजनुसार, जो बायडेन आणि पत्नी या घटनेनंतर काही वेळातच जवळच्या अग्निशमन केंद्राकडे जाताना दिसले. या आठवड्याच्या सुरुवातीला बायडेन रेहोबोथ बीचला भेट देण्यापूर्वी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या क्षेत्राला नो-फ्लाय झोन घोषित केले होते. हे 30 मैलांपर्यंतचे क्षेत्र व्यापते. फेडरल नियमांनुसार, कोणत्याही पायलटने उड्डाण करण्यापूर्वी त्याच्या मार्गावरील नो-फ्लाय झोन तपासणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.