आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन अध्यक्षांच्या अडचणी:जो बायडेन यांना 1861 च्या गृहयुद्धानंतर मिळेल सर्वाधिक विभागलेला अमेरिका, कोरोना देखील एक मोठे आव्हान

रोहि शर्मा | वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनमध्ये 90% रस्ते बंद, लोकांऐवजी 2 लाख ध्वज असतील - Divya Marathi
वॉशिंग्टनमध्ये 90% रस्ते बंद, लोकांऐवजी 2 लाख ध्वज असतील
  • ट्रम्प शपथग्रहणात सामील न होणारे चौथे राष्ट्राध्यक्ष होतील

अमेरिकेचे ४६वे राष्ट्रपती म्हणून जो बायडेन बुधवारी पदाची शपथ घेतील. परंपरेनुसार बायडेन घटनेत लिहिलेल्या ३५ शब्दांची सामान्य शपथ घेतील. मात्र, या वेळी डेमोक्रॅट जो बायडेन यांचे अमेरिकेचे नवे राष्ट्रपती होणे खूप महत्त्वाचे व वेगळे ठरेल. बायडेन असे राष्ट्रपती असतील ज्यांच्या ताब्यात अमेरिकेतील गृहयुद्धानंतर (१८६१-६५) राजकीय, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या सर्वाधिक विभागलेला देश येईल. जवळपास अडीच कोटी कोरोना रुग्ण आणि ४ लाखांपेक्षा जास्त मृत्यूंसह गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठी महामारी बायडेन यांच्यासमोर उभी आहे. ६ जानेवारीला कॅपिटल हिल दंगलीनंतर शपथग्रहण समारंभाची सुरक्षा मोठा मुद्दा आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये २५ हजार नॅशनल गार्ड तैनात आहेत. म्हणजे इराक, अफगाणिस्तान व सिरियात तैनात सैनिकांपेक्षा जास्त. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.

ट्रम्प शपथग्रहणात सामील न होणारे चौथे राष्ट्राध्यक्ष होतील

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच घोषणा केली की, ते समारंभात सहभागी होणार नाहीत. न्यूयॉर्क टाइम्सने ट्रम्प यांच्या घोषणेला देशाची लोकशाही परंपरा खंडित करणारे म्हटले आहे. मात्र, उपराष्ट्रपती माइक पेन्स समारंभात सामील होतील. अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन राष्ट्रपती त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या इनॉगरेशन सेरेमनीत सामील झाले नव्हते. १८०१मध्ये जॉन अॅडम्स, १८२९ मध्ये त्यांचे पुत्र जॉन क्वीन्सी अॅडम्स, १८६९ मध्ये अँड्रयू जॉन्सन सामील झाले नव्हते.

वॉशिंग्टनमध्ये ९०% रस्ते बंद, लोकांऐवजी २ लाख ध्वज असतील

राजधानी वाॅशिंग्टनमध्ये ६ जानेवारीपासून संचारबंदी लागू आहे, ती २१ जानेवारीपर्यंत असेल. राजधानीत ९० टक्के रस्ते व एक डझनपेक्षा जास्त मेट्रो स्थानक सुरक्षेसाठी बंद करण्यात आले आहेत. कार्यक्रमात या वेळी लोकांना बोलावण्यात आलेले नाही. त्यांच्याऐवजी २ लाख ध्वज असतील. या वेळी इनॉगरेशनमध्ये दुसऱ्या देशांच्या नेत्यांनाही बोलावण्यात आलेले नाही. शपथेनंतर बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस ‘प्रेसिडेंट एस्कॉर्ट’मधून कॅपिटल हिलवरून व्हाइट हाऊसला जातील. या वेळी १३ महिलांसह २० भारतीय अमेरिकन बायडेन यांच्या टीमचा भाग असतील.

बातम्या आणखी आहेत...