आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US President Trump Feeling Better After Taking Hydroxychloroquine, Will Take This Medicine Again If Needed

व्हाइट हाउसचा दावा:डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध, स्वतःच डॉक्टरांना विचारून घेतली रोज एक गोळी

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिलमध्ये भारताने नियम बदलून हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधीला अमेरिकेत निर्यात केल्या. (फाइल फोटो)
  • ट्रम्प यांनी भारतावर दबाव टाकून नियम बदलून अमेरिकेत मागवल्या होत्या हायड्रोक्सीक्लोरोक्विन
Advertisement
Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे रोज हायड्रोक्सीक्लोरोक्विनची एक-एक गोळी घेतली आहे. या औषधींमुळे ट्रम्प आधीपेक्षा फिट झाले आहेत. व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कायली मॅकनेनी यांनी हा दावा केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यांनीच मला सांगितले की हे औषध घेतले तेव्हापासून त्यांना आपले आरोग्य अगदी फिट वाटत आहे. आवश्यकता वाटल्यास ते आणखी अशाच प्रकारे औषधी घेतील. मॅकनेनी यांनी सांगितल्याप्रमाणे, विशेषकरून राष्ट्राध्यक्षच हे औषध घेत आहेत असे नाही. अनेक डॉक्टर आणि संशोधक सुद्धा हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे समर्थन करत आहेत. त्यांनी रुग्णांना हे औषध घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी या औषधी मागवण्यासाठी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारताने नियम बदलून हायड्रोक्सीक्लोरोक्विन इतर देशांना निर्यात केले होते.

व्हाइट हाउसमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले औषध

ट्रम्प यांनी आठवडाभरापूर्वी सांगितले होते की ते व्हाइट हाउसमध्येच कार्यरत एका डॉक्टरच्या सल्ल्याने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध घेत आहेत. आपणच डॉक्टरांना विचारून हे औषध घेण्यास सुरुवात केली असे ते म्हणाले. मी त्यांना विचारलो होतो की हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध घेण्याबद्दल तुमचे काय मत आहे? त्यावर आपल्याला हवे असल्यास हे औषध घेऊ शकता असे डॉक्टरांनी सांगितले होते. या औषधीने तुमच्या आरोग्यावर काहीच वाइट परिणाम होणार नाही. साइड इफेक्टने तुमचा मृत्यू होऊ शकत नाही असेही डॉक्टर म्हणाले होते. वाटल्यास मी हे औषध बंद देखील करेन असेही ट्रम्प म्हणाले होते.

FDA ने हायड्रोक्सीक्लोरोक्विनवर केले होते सतर्क

अमेरिका सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने हायड्रोक्सीक्लोरोक्विन संदर्भात इशारा दिला होता. कोरोना रोखण्यासाठी या औषधीचा वापर केला जाऊ नये असे त्यांनी म्हटले होते. एफडीएने याचे साइड इफेक्ट लक्षात घेऊन हा इशारा दिला होता. या औषधीतून आरोग्याला धोका असल्याचे देखील सांगण्यात आले होते. अमेरिकेतील सध्याच्या नियमानुसार, या औषधी केवळ आपातकालीन परिस्थितीतच वापरता येऊ शकतात.

Advertisement
0