आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे जवळचे मित्र आणि अब्जाधीश स्टेनली चेरा यांचे कोरोनामुळे निधन

वाशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेनली चेरा न्यूयॉर्कमधील मोठे रिअल इस्टेट कंपनीचे मालक आणि रिपब्लिकन पार्टीचे कट्टर समर्थक होते

रिपब्लिकन पार्टीचे मोठे समर्थक आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र स्टेनली चेरा यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. स्टेनली न्यूयॉर्कमधील मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक होते आणि रिपब्लिकन पार्टीचे कट्टर समर्थक होते. स्टेनली यांनी ट्रम्प यांना निवडणूक प्रचारासाठी मोठी रक्कम दिली होती. स्टॅनली नेहमीच सार्वजनिक सभांमध्ये ट्रम्प यांना आपला जवळचा मित्र असल्याचे सांगत होते. 

स्टेनली यांची खेळणीची कंपनी होती, त्यांनी रिअल इस्टेटमध्ये नशीब आजमावले

फेडरल इलेक्शन कमीशननुसार 2016 ते 2019 दरम्यान स्टेनली यांनी रिपब्लिकन पार्टी, ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी 4 लाख डॉलर (अंदाजे 3 कोटी रुपये) रक्कम दिली होती. स्टेनली यांच्या कुटुंबियांची लहान मुलांची खेळणी बनवण्याची कंपनी होती. मात्र त्यांनी न्यूयॉर्क येथे येऊन रिअल इस्टेटमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. स्टेनली यांची क्राउन अॅक्वेझिश ही रिअल इस्टेट कंपनी लोकप्रिय आहे. स्टेनली यांच्या कंपनीकडे न्यूयॉर्कमधील सेंट रेजिस न्यूयॉर्क आणि कार्टर मेंशन यांसारखी अनेक मालमत्ता आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा वाढता कहर 

अमेरिकेत रविवारी 27 हजार 523 नवीन प्रकरणे समोर आली. यानंतर देशातील संक्रमितांची संख्या 5 लाख 60 हजार 402 झाली आहे. रविवारी 1528 लोकांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण मृतांची संख्या 22 हजार 105 झाली आहे. न्यूयॉर्क राज्यात मागील 24 तासांत 758 लोकांचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...