आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US President Voting Counting : Donald Trump Supporters Protest In US Capitol Hill Joe Biden Elections News And Updates.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत राडा:मतमोजणीवेळी ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, संसदेत गोळीबार; एका महिलेचा मृत्यू

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी गदारोळ आणि तोडफोड सुरू केली तेव्हा पोलिसांनी मोर्चा सांभाळला. गोंधळ घालणाऱ्यांना दूर करण्यासाठी पोलिस कर्मचारी रिव्हॉल्व्हर रोखताना दिसून आले. - Divya Marathi
बुधवारी अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी गदारोळ आणि तोडफोड सुरू केली तेव्हा पोलिसांनी मोर्चा सांभाळला. गोंधळ घालणाऱ्यांना दूर करण्यासाठी पोलिस कर्मचारी रिव्हॉल्व्हर रोखताना दिसून आले.

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर ज्याची भीती होती तेच घडले. बुधवारी येथे बुधवारी जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे दोन्ही सभागृह एकत्र आले. मतमोजणी दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शेकडो समर्थक संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये घुसले. यावेळी गोळीबार देखील झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला. कित्येक तासांनंतर आम्ही निर्भयपणे आपले काम सुरू ठेवू असे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (एचओआर) ची अध्यक्ष नॅन्सी पेलोसी म्हणाल्या. दरम्यान बायडेन यांच्या विजयाची औपचारिक घोषणा कधी होईल हे अद्याप निश्चित झाले नाही.

कॅपिटल हिलमध्ये हिंसा

बुधवारी इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी आणि बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृह सीनेट आणि HOR ची बैठक सुरु झाली. यादरम्यान ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीचे शेकडो समर्थक संसदेच्या बाहेर जमा झाले. नॅशनल गार्ड्स आणि पोलिस त्यांना समजावून सांगण्यापूर्वी काही लोक आत शिरले. मोठ्या प्रमाणात तोड़फोड आणि हिंसा झाली. यादरम्यान गोळीबारही झाला. मात्र ही गोळी कोणी आणि का झाडली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र यात एका महिलेचा मृत्यू झाला.

सध्या काय होत आहे?

गोंधळ घालणाऱ्यांना दोन्ही सदनातून बाहेर काढले आहे. गदारोळ सुरू असताना खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ते पुन्हा सदनात दाखल झाले असून संसदेच्या कार्यवाहीला पुन्हा सुरुवात झाली.

अमेरिकन संसदेत गोळीबार

न्यूयॉर्क टाइम्सने एक फोटो द्वारे सांगितले की, जेव्हा ट्रम्प समर्थक संसदेत गोंधळ घालत होते, तेव्हा काही पोलिस अधिकाऱ्यांना दंगलखोरांवर बंदूक धरली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, दुसरीकडून कोणी गोळी झाडली हे अद्याप समजले नाही.

लष्कराचे विशेष रक्षक तैनात

या घटनेनंतर डीसी मधील अमेरिकन सैन्याच्या विशेष तुकडीला पाचारण करण्यात आले. मात्र 20 मिनिटात त्यांन मोर्चा सांभाळला. कॅपिटल हिलच्या बाहेर आणि आत एकूणच 1100 विशेष गार्ड तैनात असून संचारबंदी लागू आहे.

बातम्या आणखी आहेत...