आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • US Presidential Election Updates : Delays In The Results Have Caused Havoc In Many Cities, 8 Arrested In Seattle; The Thrill Of The Result Abroad Is Like The 'World Cup Final'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:निकालातील विलंबाने अनेक शहरांत धुमश्चक्री, सिएटलमध्ये ८ अटकेत; परदेशातही निकालाचा ‘वर्ल्ड कप फायनल’ सारखा रोमांच

वॉशिंग्टन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र वॉशिंग्टन डीसीचे आहे. निवडणुकीच्या मत माेजणीदरम्यान ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने झाली. पोलिस व आंदोलकांत हा संघर्ष उडाला. त्यात काही निदर्शक जखमीही झाले.
  • न्यूयॉर्कमध्ये हिंसाचाराच्या भीतीने शेकडो दुकाने बंद, व्हाइट हाऊसजवळ ट्रम्प यांच्याविरोधात कृष्णवर्णीयांचा आक्रोश

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील शेवटच्या निकालातील विलंबामुळे दोन्ही पक्षांतील समर्थकांत अनेक शहरांत संघर्ष उडाला होता. वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्याविराेधात कृष्णवर्णीयांचा आक्राेश पाहायला मिळाला. वॉशिंग्टनमध्ये हजाराे लाेकांनी व्हाइट हाऊस परिसरात ब्लॅक लाइव्हज मॅटर प्लाझावर एकजुटीचे दर्शन घडवले. गेल्या काही दिवसांपासून हे ठिकाण कृष्णवर्णीयांच्या आंदाेलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आंदाेलकांनी ट्रम्प यांच्याविराेधात घाेषणाबाजी केली. वाहतूक जाम केली. फटाके फाेडले. त्यापैकी काही आंदाेलकांची पाेलिसांसाेबत धुमश्चक्री उडाली. वॉशिंग्टनचे महापाैर मुरियल बाॅउसर म्हणाले, काही लाेकांनी जाणूनबुजून गदाराेळ निर्माण केला. सिएटलमध्ये आंदाेलकांनी वाहतूक राेखली. पाेलिसांनी येथे हिंसाचाराच्या आराेपाखाली आठ लाेकांना अटक केली. या लाेकांनी एका अधिकाऱ्यावर हल्ला केला हाेता, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. न्यूयाॅर्कमध्येही निदर्शने झाली. आम्हाला न्याय मिळाला नाही तर कुणालाही शांतता मिळणार नाही, अशा घाेषणा देण्यात आल्या. ट्रम्प नेहमी खाेटे बाेलतात, असे फलक आंदाेलकांनी लावलेले हाेते. आंदाेलकांनी पाेलिसांच्या वाहनांची जाळपाेळ केली. येथील हिंसाचारादरम्यान शेकडाे दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. दुसरीकडे प्रशासनाने सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संपूर्ण निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर परिस्थिती चिघळू शकते, असे सुरक्षा संस्थांना कळवले आहे.

परदेशातही निकालाचा ‘वर्ल्ड कप फायनल’ सारखा रोमांच

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचा विरोधक मानल्या जाणाऱ्या इराणमध्येही हॅशटॅग इलेक्शन अमेरिका ट्रेंडिंगमध्ये टॉपवर होते.

ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, जपान या देशांत रेस्तराँ, कॅफेमध्ये लोक निकालासंबंधी वृत्ताकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. इंडोनेशियाच्या बायनस विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संवाद विभागाचे प्रोफेसर फैजर करिम यांच्या शब्दांत वर्ल्ड कप फायनलसारखा रोमांच दिसून आला. दुसरीकडे चीनमध्ये निकालासंबंधी हॅशटॅग अमेरिकेचे प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोवर ३९० वेळा पाहण्यात आले. दक्षिण कोरिया, रशिया, ब्राझीलच्या माध्यमांत निकालाशी संबंधी बातम्यांची गर्दी दिसून आली.