आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US Presidential Polls Elections Results 2020 Latest News And Updates : Joe Biden Defeats Donald Trump

बायडेन सरदार, कमला असरदार:77 वर्षीय बायडेन अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष, 32 वर्षांत तीन प्रयत्नांनंतर बायडेन राष्ट्राध्यक्षपदी विजयी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांच्या विजयाचे भारताच्या दृष्टीने असे आहे महत्त्व
  • बायडेन यांनी 27 व्या वर्षी सासूला सांगितले होते - एक दिवस राष्ट्राध्यक्ष होईन

अमेरिकी अध्यक्षपदासाठी चार दिवसांपासून सुरू असलेला मतपेटीतील अखेर संघर्ष थांबला. जो बायडेन हेच अमेरिकेचे नवे अध्यक्ष होणार हे शनिवारी निश्चित झाले. डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यांनी पेन्सिल्व्हेनिया व नेवाडामध्ये तगडे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. विजयासाठी आवश्यक २७० पेक्षा ९ अधिक मते घेऊन बायडेन यांनी मुसंडी मारताच ट्रम्प यांना आता पुन्हा संधी नाही हे निश्चित झाले. त्यांना व्हाइट हाऊस सोडावेच लागेल. २८ वर्षांत प्रथमच यंदा अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळू शकलेला नाही. बायडेनपेक्षा त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांनी मोठा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला असून अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. कमला यांची आई मूळ तामिळनाडूची होती. दरम्यान, बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी २००९ ते २०१७ दरम्यान बराक ओबामा यांच्या काळात ते उपाध्यक्ष होते. तीन दशके त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जीव तोडून प्रयत्न केले होते.

बायडेन यांनी २७ व्या वर्षी सासूला सांगितले होते - एक दिवस राष्ट्राध्यक्ष होईन

२७ वर्षांचे असताना बायडेन यांनी पहिले लग्न १९६६ मध्ये केले होते. काय काम करता, असा प्रश्न मुलीच्या आईने केला. ते उत्तरले, मी एके दिवशी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईन. ३२ वर्षांत तिसऱ्या प्रयत्नात ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले.

ट्रम्प घुसखोर; टीम बायडेनकडून टीका

डोनाल्ड ट्रम्प अद्याप आपल्या विजयाचे दावे करीत आहेत. यावर बायडेन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बायडेन यांच्या प्रचार टीमचे प्रवक्ते अँड्र्यू बेट्स म्हणाले, व्हाइट हाऊसमधून घुसखोराला बाहेर हाकलण्यासाठी अमेरिकी प्रशासन सक्षम आहे. तर ‘देशासाठी काम करणे हे आमचे राजकीय ध्येय आहे. संघर्षाला खतपाणी न घालता नवी सुरुवात करूया,’ असे बायडेन म्हणाले.

कमला हॅरिस यांची पहिली प्रतिक्रिया

ही निवडणूक माझ्या किंवा जो बायडेन यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची होती. ती अमेरिकेचा आत्मा व देश एकसंध राखण्यासाठी लढण्याच्या इच्छेच्या बाबतीत आहे. आपल्याला खूप कामे करायची आहेत. चला ती सुरू करूया...

गरिबांच्या तारणहार म्हणून कमला यांची ओळख, स्टार प्रतिमेमुळे प्रकाशझोतात

कमला हॅरिस या लिंगभेद-वर्णद्वेषासारख्या आव्हानांचा मुकाबला करून इथपर्यंत पाेहोचल्या आहेत. त्या सॅनफ्रान्सिस्को जिल्ह्याच्या अॅटर्नी, तर कॅलिफोर्नियाच्या पहिल्या कृष्णवर्णीय अॅटर्नी जनरल राहिल्या. कमला या डेमोक्रॅटिक पार्टीत बायडेन यांच्या कडव्या विरोधक राहिल्या आहेत. मात्र आता त्यांच्या सहकारी आहेत. २०११ मधील बँकिंग क्षेत्रातील मंदीमुळे बेघर झालेल्यांना भरपाई देण्यासाठी कमला यांनी मोहीम राबवली. यानंतर त्या राष्ट्रीय आयकाॅन बनल्या.

प्राधान्यक्रम :

महामारी नियंत्रण व रोजगार राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी प्राधान्यक्रम सांगितला. अाम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत.परंतु काम सुरू करण्यासाठी वाट पाहणार नाही.पहिल्या दिवसापासूनच कोरोना नियंत्रणासाठी एक योजना लागू करणार आहोत. लाखो लोक रोजी-रोटीकरिता हैराण आहेत. हे डोळ्यासमोर ठेवून आर्थिक योजना तयार केली आहे.

बायडेन यांच्या विजयाचे भारताच्या दृष्टीने महत्त्व

> २००६ मध्ये बायडेन म्हणाले होते, सर्वात दृढ संबंध असणाऱ्या दोन देशांत अमेरिका व भारत असावेत,असे माझे स्वप्न आहे.

> उपराष्ट्राध्यक्षपदी असताना अमेरिकेने युनोत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र, पाक-चीनबद्दल भूमिका अस्पष्ट.

> कमला हॅरिस यांनी काश्मीर मुद्द्यावर मतप्रदर्शन केले आहे. त्यामुळे कलम ३७० चा मुद्द्यावर त्यांचे मत भारताच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते.

दोन वर्षे बायडेन यांची कसोटी

विधेयके, करारास सिनेटची मंजुरी लागते. डेमोक्रॅटिकचे ४७ सदस्य आहेत.या स्थितीत रिपब्लिकनचे बहुमत असताना बायडेन यांना विधेयके मंजूर करून घेणे कठीण जाईल. दोन वर्षांनी मध्यवर्ती निवडणूक होईपर्यंत अडचण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...