आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे उप सहाय्यक तथा समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी भारतीय सीमेवर चीनने काही प्रक्षोभप पाऊले उचलल्याचा दावा केला आहे. ते अमेरिकेतील थिंक टँक सेंटर फॉर न्यू अमेरिकन सेक्युरिटीशी संवाद साधताना म्हणाले की, सीमेवर चिनी घुसखोरीसह संघर्ष वाढला आहे. यामुळे मोठा संघर्ष होण्याची भीती आहे.
चीन 2020 पासून पूर्व लडाखमधील एलएसीवर एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची ही कुरापत शांततेसाठी गंभीर धोका आहे. भारताचे मित्र देश व भागीदार याविषयी तीव्र चिंतेत आहेत, असे कर्ट कॅम्पबेल म्हणाले. अमेरिका, भारताचा सहयोगी देश नाही व होणारही नाही. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही जवळचे भागीदार बनू शकत नाही.
अमेरिकने चीनविरोधात भारताला साथ द्यावी
चीनसोबतच्या वादात आता अमेरिकेने भारताची साथ दिली पाहिजे. हा खुलासा सेंटर फॉर अ न्यू अमेरिकन सिक्योरिटीने गुरुवारी ‘इंडिया-चायना बॉर्डर टेन्शन अँड यूएस स्ट्रॅटेजी इन द इंडो-पॅसिफिक’ नामक अहवालातून झाला आहे.
कॅम्पबेल म्हणाले - चीनची कृती प्रक्षोभक
कॅम्पबेल थिंक टँकला म्हणाले की, 5000 मैलच्या विशाल सीमेवर चीनने जी काही पाऊले उचलली आहेत, ती प्रक्षोभक व भारतीय भागीदार व मित्रांसाठी अत्यंत चिंताजनक आहेत. या अहवालात भारतीय सीमेवरील चीनचे आक्रमण रोखणे व प्रतिक्रिया देण्यात मदत करण्यासाठी विविध उपाय सूचवण्यात आलेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.