आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US President's First Reaction To Taliban Takeover: Decision To Withdraw Troops; News And Live Updates

अफगाणिस्तान वाद:अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता, तालिबान्यांनी देश काबिज केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांच्यावर केली टीका

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानावर कब्जा केला असून राजधानी काबूल ही ताब्यात घेतली आहे. अमेरिका, भारतासह अनेक देशांनी आपले नागरिक परत बोलावले आहे. देशातील परिस्थिती चिघळत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला आहे.

याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणी नेते आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येण्यात अपयशी ठरले असून ते आपल्या भविष्यासाठी उभे राहू शकले नाही अशी खंत बायडेन यांनी यावेळी व्यक्त केली. ते राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बोलत होते.

सैन्य वापसीचा निर्णय योग्यच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सैन्य वापसीचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्‍या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता. अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कोणताही खेद नाही. या निणर्यामुळे माझ्यावर टीका केली जाईल हे मला माहित आहे त्यामुळे मी या सर्व टीका स्वीकारायला तयार असल्याचे बायडेन म्हणाले.

ट्रम्प यांच्यावर केली टीका
या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुल आउट डीलसाठी माजी अध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. मी हा निर्णय आगामी राष्ट्राध्यक्षांवर सोडणार नाही. कारण गेल्या चार राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात हे चालत राहिले. त्यामुळे जर अफगणाचं सैन्य लढायला तयार नसेल तर अमेरिकींनाही तिथे आपला जीव गमावण्याची गरज नाही असे बायडन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...