आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:एच-वन बी व्हिसावर अमेरिकेचा फेरविचार, भारतीय चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील नवे बायडेन प्रशासन लवकरच ट्रम्प सरकारच्या एच-वन बी व्हिसाबाबतच्या चुकीच्या निर्णयांचा फेरविचार करणार आहे.

परदेशी कामगारांसाठीचा अर्ज ‘आय -१२९’ पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी नागरिकत्व आणि इमिग्रेशन संस्था (यूएससीआयएस) म्हटले आहे. विपरीत परिणाम करणाऱ्या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. यामुळे भारतीय चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील तीन निर्णय बायडेन सरकारने यापूर्वीच रद्द केले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे एच-वन बी व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी कामगार -कर्मचाऱ्यांना विशेषत: भारतीय चाकरमान्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. एच-वन बी व्हिसा भारतीयांमध्ये विशेष प्रिय आहे. या व्हिसाच्या आधारे अमेरिकी कंपन्या उच्च शिक्षित आणि कौशल्यप्राप्त परदेशी कामगारांना नोकऱ्या देतात.

दरवर्षी विविध श्रेणीमध्ये एकूण ८५ हजार व्हिसा जारी केले जातात. त्याची मुदत तीन वर्षे असते. ट्रम्प प्रशासनाने एच-वन बी व्हिसासह अन्य वर्क व्हिसाशी संबधित नियम अधिक कडक केले होते.

बातम्या आणखी आहेत...