आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात पारित झालेले ‘काैंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरिज थ्री सँक्शन्स अॅक्ट’ किंवा काट्सा कायद्याचे विधेयक भारताला कडक निर्बंधाच्या तरतुदींपासून सवलत देणारे आहे. त्याला खन्ना दुरुस्ती म्हटले जाते. त्यास भारतवंशीय खासदार रो खन्ना यांनी मांडले होते. त्याच्या बाजूने ३३० व विरोधात ९९ मते पडली. त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी ते राष्ट्राध्यक्षापर्यंत जाणे आवश्यक आहे. परंतु त्याआधी ते सिनेटमध्ये पारित होणे अनिवार्य आहे. परंतु काही वरिष्ठ व शक्तिशाली सिनेटर भारताला सवलत देण्यास तयार नाहीत. आम्ही भारताला पसंत करत नाहीत, असा मुद्दा नाही. परंतु त्यातून रशियाला अब्जावधी डॉलरचा लाभ होत आहे.
त्यामुळे सिनेट भारताला निर्बंधातून सवलत देणाऱ्या काट्सा कायद्यात दुरुस्ती करणार नाही. रशियाकडून शस्त्र खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका काट्सा कायद्यांतर्गत निर्बंध लावू शकते. भारताने रशियाकडून अत्याधुनिक शस्त्र प्रणाली एस-४०० खरेदी केले होते. त्यानंतर भारतालाही कायद्याचा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. एका खासदाराने नाव न प्रकाशित करण्याचा अटीवर सांगितले, रशियाला आर्थिक मदत होऊ शकेल, असे कोणतेही पाऊल उचलण्याची सिनेटरची तयारी नाही. म्हणूनच प्रमुख सिनेटर या विधेयकाला पारित होऊ देणार नाहीत. रशियाला फायदा पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या बाजूने मतदान करताना दिसू द्यायचे नाही, असे डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन सदस्यांना वाटते. या आधी अमेरिकेने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केल्यावरून चीन व तुर्कस्तानवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेतील अनेक राज्यांतील भारतवंशीयाची संख्या मोठी आहे. न्यूजर्सी देखील त्यापैकीच आहे. येथे आशिया वंशाचे सर्वाधिक मतदार आहेत. २०१७ च्या जनगणनेनुसार न्यूजर्सीमधील भारतवंशीयांची लोकसंख्या मोठी आहे. परदेशी संपर्क समितीचे अध्यक्ष व काट्सा विधेयकाचा मसुदा लिहिणारे रॉबर्ट मेनेंडेज हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. रॉबर्ट भारत व अमेरिका संबंधाचे हितैषी आहेत. परंतु कट्टर रशियाविरोधक आहेत. २०२१ मध्ये रॉबर्ट यांनी संरक्षणमंत्री लॉॅयट ऑस्टिन यांना एक पत्र पाठवले होते. भारताने रशियाकडून एस-४०० प्रणाली खरेदी केल्यास भारतावर काट्साअंतर्गत कारवाई होईल. संयुक्त प्रकल्पाद्वारे लष्करी तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकणार नाही. तुम्ही द्विपक्षीय चर्चेत भारताच्या समकक्ष नेत्याकडे यासारख्या आव्हानांची स्पष्ट कल्पना द्याल, अशी आशा आहे. भारताशी माझी चर्चा होईल. भागीदारी लोकशाही मूल्यांवर आधारित असली पाहिजे, हे भारताला सांगायला आवडेल.
खन्नांना पुढे करून बायडेन यांचा डाव
संरक्षण अर्थसंकल्पाची जबाबदारी असलेले जॅक रीड रो खन्ना दुरुस्ती विधेयकाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. रो खन्ना यांना बायडेन यांनी कठपुतळी म्हणून वापरल्याची चर्चा आहे. भारतवंशीय समुदायाची नाराजी ओढून घ्यायची नसल्याचा बायडेन यांचा हेतू आहे.
काट्सामध्ये चीन, तुर्कीवर निर्बंध लागू
काट्सामुळे चीनला निर्बंधांना तोंड द्यावे लागले होते. चीनने रशियाकडून एस-३५ व एस-४०० चा सौदा झाला होता. तुर्कीने रशियाकडून एस-४०० चा सौदा निश्चित केला. त्यावर अमेरिकेने तत्काळ कारवाई केली होती. तुर्की सरकारी एजन्सीच्या प्रमुखांची संपत्ती जप्त केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.