आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूकंपाचा अंदाज लावणे शक्य आहे का, अशी विचारणा अमेरिकी भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाकडे नेहमी केली जाते. संस्थेच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, कुठल्याही वैज्ञानिकाने मोठ्या भूकंपाची घोषणा केलेली नाही. पण संस्थेच्या या उत्तरात लवकरच बदल होणार आहे. अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर लॉस एलोमॉस नॅशनल लॅबोरेटरीत भूगर्भशास्त्र वैज्ञानिक डॉ. पॉल जॉन्सन यांच्या चमूने भूकंपाची भविष्यवाणी वर्तवू शकेल असे उपकरण विकसित केले आहे.
मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आता सिस्मॉलॉजीवर लागू केली जात आहे. डॉ. जॉन्सन यांनी सांगितले की, मशीन लर्निंगच्या प्रणालीला प्रशिक्षित करण्यासाठी भूकंपाच्या १० सायकलच्या डेटाची गरज भासते. उदाहरणार्थ कॅलिफोर्नियात सॅन अँड्रियास फाॅल्ट दर ४० वर्षांत मोठा भूकंप घडवतो. पण ते समजून घेण्यासाठी पुरेसा उपयोगी डेटा मागील २० वर्षांचाच उपलब्ध आहे. त्यावर जॉन्सन आणि त्यांच्या चमूने २०१७ मध्ये मशीन लर्निंगप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या घटनांवर (धिम्या गतीच्या घटना, ज्यांना सायलेंट क्वेकही म्हटले जाते) हा डेटा लागू केला. भूकंप सामान्यपणे काही सेकंदांतच संपतो, पण सायलेंट क्वेकमध्ये तास, दिवस किंवा महिनेही लागू शकतात. मशीन लर्निंगच्या दृष्टीने हे चांगले आहे. कारण तो मोठ्या प्रमाणावर डेटा देतो. टॅक्टोनिक वैविध्यता असलेल्या सॅन अँड्रियाज या भागामध्ये डॉ. जॉन्सन यांची लॅब आहे. तेथे दर १४ महिन्यांत भूस्तरात सौम्य घसरण होते. १९९० पासून वैज्ञानिक ते रेकॉर्ड करत आहेत. म्हणजे डेटाचे अनेक फुल सायकल आहेत. मशीन लर्निंग सिस्टिम या आधारावर अशा घटना पुन्हा केव्हा होतील हे सांगण्यात यशस्वी ठरली आहे.
४५ हजार जणांचे प्राण वाचू शकले असते : अमेरिकी जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या एक दशकात जगात भूकंपामुळे ४५ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्यांची पूर्वसूचना मिळाली असती तर या ४५ हजार जणांचे प्राण वाचवता येऊ शकले असते.
भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी संवेदी क्षेत्रात करणार सिस्टिमचा वापर
लॅब क्वेक असे मिनिएचर भूकंप आहेत, जे लॅबमध्ये काचेच्या मोत्यांवर थोड्या दबावाने निर्माण केले जातात. चमूने एक सिम्युलेशनही (काॅम्प्युटर मॉडेल) तयार केले आहे. ते या हालचाली कॅप्चर करण्यास सक्षम आहे. त्यावर आपल्या मशीन लर्निंग सिस्टिमला भूकंपाच्या अंदाजासाठी हा चमू प्रशिक्षित करत आहे. ती वास्तविक भूगर्भीय दोष जाणून घेण्यासाठी सॅन अँड्रियाज फॉल्टमध्ये लावणार आहेत. तेथे २००४ मध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. तीन ते सहा महिन्यांत परिणाम मिळतील. जाॅन्सन यांच्या मते हा क्रांतिकारी शोध असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.