आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाकेबंदीची तयारी:चीनमध्ये बदल घडावा यासाठी जगाने वठणीवर आणावे, पॉम्पिआे भडकले

कॅलिफाेर्निया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने सावरणारे हातच कापले

चीनला वठणीवर आणण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीवर त्यांच्या पद्धती बदलण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे. दबाव गट म्हणून अमेरिका तसेच सहकारी देशांना आणखी दृढपणे व रचनात्मक पद्धतीने काम करावे लागेल. खरे तर चीनच्या डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम इतर अनेक देशांनी केली. मात्र चीनने याच सावरणाऱ्या व भरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हातांना जणू कापले आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पिआे यांनी फटकारले. माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे जन्मस्थान याॅर्बा लिंडाला पाॅम्पिआे यांनी भेट दिली. या प्रसंगी ते म्हणाले, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसाठी जगाची दारे खुली करून फँकनस्टीन (दैत्य) तयार केला आहे, असे एकदा निक्सन यांनी म्हटले हाेते. ते आज खरे हाेताना दिसून येते.

निक्सन यांनी १९७९ मध्ये चीन व अमेरिकेतील कूटनीतीच्या संबंधांचा पाया रचला हाेता. १९७२ मध्ये ते स्वत: बीजिंगला गेले हाेते. पाॅम्पिआे यादरम्यान म्हणाले, चीनचे सैन्य आणखी जास्त बळकट हाेत चालले आहे आणि नवी समस्या निर्माण करत आहेत. चीनच्या विराेधात अविश्वास दर्शवण्याचे वर्तन स्वीकारले पाहिजे. राष्ट्राध्यक्ष राेनाल्ड रिगन यांनी १९८० मध्ये साेव्हिएतसाठी ‘खात्री करूनच विश्वास ठेवा’ सारखे धाेरण राबवले हाेते. वास्तव वेगळे आहे.

सूड : चीनने अमेरिकी दूतावास केला बंद
ह्यूस्टनमध्ये दूतावास बंद झाल्याने संतापलेल्या चीनने चेंग्डू येथील अमेरिकेचे राजदूत कार्यालय बंद करण्याचे आदेश दिले. हा दूतावास चीनमध्ये अनेक प्रांतांत कामकाज पाहताे. या केंद्राजवळ तिबेट स्वायत्तशासित भागाचीदेखील जबाबदारी आहे. तिबेटबद्दल अमेरिकेची पावले पाहून चीनने हा निर्णय घेतला. चीनने पाकिस्तानला मात्र मदतीचे धोरण ठेवले आहे.

चीनविराेधात लढण्यासाठी मित्रराष्ट्रांशी चर्चा करून शोधतोय ताेडगा
निक्सन ग्रंथालयात पाॅम्पिआे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चीनविराेधात आम्ही आपल्या सहकारी देशांसाेबत ताेडगा शाेधत आहाेत. वर्तमानातील हे सर्वात माेठे आव्हान व अभियान आहे. चीन आपल्या लाेकांची खुशाली व स्वातंत्र्याच्या दृष्टीने धाेकादायक हाेत चालला आहे. कम्युनिस्ट पार्टीचे शासक काेणत्या दिशेने जात आहेत, याचा अमेरिकेतील नेत्यांना १९७० मध्ये अंदाज आला हाेता. चीनमध्ये मानवी हक्कासाठी काही स्थान नाही. व्यवसायवृद्धी व नफ्यासाठी अनेक गाेष्टींचा अवलंब करताे. आता अमेरिकी समाजात फूट पाडण्याचे चीनचे कारस्थान आहे. परंतु चीनला अमेरिकेच्या शक्तीचा अंदाज नाही. चीनने आपली सैन्यशक्ती वाढवली आणि आणखी वाढवण्याचाही प्रयत्न केला.

धमकी : द. चीन सागरात अमेरिकेने पाठवले बाॅम्बर
दक्षिण चीन सागरात अमेरिका व चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. तैवानजवळ उड्डाण घेताच एका अमेरिकी विमानाला चीनने धमकी देत दूर पळवले. त्यानंतर भडकलेल्या अमेरिकेने या भागात स्ट्रॅटेजिक बाॅम्बर विमानांची गस्त वाढवली. या विमानासाेबत अमेरिकेचा संपूर्ण लढाऊ विमानांचा ताफा गस्त घालत हाेता. या सागरी क्षेत्रातील तणाव वाढत आहे.

आराेप : हेरगिरीचा अड्डा बनले हाेते चिनी राजदूत
पाॅम्पिआे म्हणाले, चीनचा ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास हेरगिरीचा अड्डा बनले हाेते. अमेरिकेने चीनच्या या दूतावासाला बंद करण्याचा आदेश दिला हाेता. चीनने आमची बाैद्धिक संपदा चाेरली. व्यापाराची महत्त्वाची माहितीही चाेरली. त्यामुळे लाखाे अमेरिकींना नाेकऱ्या गमवाव्या लागल्या. म्हणूनच आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागली.