आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या सिनेटने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या टिकटॉकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यूएस अधिकारी आणि दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी टिकटॉकच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. टिकटॉक अॅप हे चीनमधील Bytedance या कंपनीने तयार केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे की, चीनच्या या व्हिडीओ अॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचू शकतो.
रिपब्लिकन सिनेटर जोश हॉले यांनी टिकटॉकला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा धोकादायक व्हायरस म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, जोपर्यंत कंपनी चीनसोबतचे सर्व संबंध तोडत नाही, तोपर्यंत सरकारी उपकरणांमध्ये त्याला स्थान मिळणार नाही.
एका राज्याने आधीच टिकटॉकवर बंदी घातली आहे
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टिकटॉकच्या वापरावर बंदी घातली होती. यामागे देशाची सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आणखी अनेक राज्ये असेच करण्याची शक्यता बळावली आहे.
मंगळवारी, रिपब्लिकन पक्षाचे रुबियो आणि माईक गॅलाघर तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला.
अमेरिकेत टिकटॉकची चौकशी
सध्या अमेरिकेची विदेशी गुंतवणूक समिती टिकटॉक अॅपची चौकशी करत आहे. ज्यामध्ये टिकटॉक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे की नाही हे तपासले जात आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, यूएस खासदारांनी अॅपच्या कार्यपद्धतीशी संबंधित अनेक प्रश्न विचारून टिकटॉकच्या अधिकाऱ्याना प्रश्न केले होते. ज्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, तपास पूर्ण झाल्यानंतर जो अंतिम करार केला जाईल तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व भीती दूर करेल.
बायडेन यांनी टिकटॉकच्या मदतीने प्रचार केला
टाईमच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये बायडेन यांनी आपल्या प्रचारासाठी टिकटॉक इन्फ्लुएंसर व्यक्तीचा सहारा घेतला होता. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान त्यांनी टिकटॉक आणि चीनवर अमेरिकेची सुरक्षा अनेक प्रकारे धोक्यात आणल्याचा आरोप केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.