आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान:अमेरिकेने पाकवर निर्बंध घालावे, रसद थांबवावी; काबूलमध्ये मादक पदार्थांना पाकमुळे प्रोत्साहन

काबूल / जेन पर्लेज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात प्रवेश करू इच्छिणारे हजारो अफगाणी सीमेवर १० दिवसांपासून ठिय्या देऊन आहेत. - Divya Marathi
पाकिस्तानात प्रवेश करू इच्छिणारे हजारो अफगाणी सीमेवर १० दिवसांपासून ठिय्या देऊन आहेत.

तालिबानने काबूलवर वर्चस्व मिळवल्यानंतर इस्लामाबादमधील प्रमुख मशिदींवर तालिबानचा ध्वज फडकत होता. ही गोष्ट पराभूत अमेरिकींना थोबाडीत लगावल्यासारखीच होती. कारण अल-कायदा व तालिबानविरोधी युद्धात पाकिस्तानने अमेरिकेचा भागीदार असल्याचे दाखवले होते. पण गेल्या दोन दशकांत पाकिस्तानने अमेरिकेकडून अब्जावधी डॉलरची मदत मिळवली. याबाबतीत पैशांचा अपव्यय झाल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. अमेरिका व पाकिस्तानचे संबंध सुरुवातीपासून दुटप्पीपणावर आधारित होते. अफगाण तालिबानशी अमेरिकेचा संघर्ष सुरू होता. वास्तविक पाकची गुप्तचर संस्था आयएसआयनेच ही संघटना जन्माला घातली आहे. आता तरी अमेरिकेेने पाकिस्तानची रसद बंद करावी, अशी मागणी अमेरिकेसह काही देशांतून केली जात आहे. आदिवासी नेत्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन महिन्यांत तालिबान संपूर्ण अफगाणिस्तानात अतिक्रमण करत होता. तेव्हा पाकिस्तानच्या लष्कराने हजारो जवानांच्या तुकड्या अफगाणला पाठवून अमेरिकेच्या पराभवावर जणू शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तानात सीआयएचे माजी स्टेशन प्रमुख रॉबर्ट एल. ग्रेनियर म्हणाले, पाकिस्तानी व आयएसआयला अफगाणिस्तानात विजय मिळाला आहे, असे वाटत आहे. परंतु पाकिस्तानातील नागरिकांनी यावर विचार केला पाहिजे. त्यांना नेमके काय हवे आहे? तालिबानी वर्चस्वानंतर पश्चिमेत पाकिस्तानची उरलीसुरली प्रतिष्ठाही गेली आहे. पाकमध्येही बंदीची मागणी वाढू लागली आहे. परदेशी निधीच्या अभावामुळे पाकिस्तान काबूलमधील नव्या शासकाच्या अमली पदार्थांवर आधारित व्यापारावर अवलंबून होत चालल्याचे दिसते. त्यामुळे पाकिस्तानात आता तालिबान आणि इतर दहशतवादी संघटना पाय पसरू लागतील, यात शंका वाटत नाही. अशा परिस्थितीत एका विस्कळीत देशाला बक्षीस मानून त्याचे करायचे काय, हा पाकिस्तानच्या नागरिकांसाठी असलेला कळीचा प्रश्न ठरेल. पाकिस्तानचे खलील हक्कानी रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयात नियमित दिसून येतो. आता तो अफगाणिस्तानातील नव्या सत्ताधाऱ्यांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या माजी राजदूत मलिहा लोहदी यांनी जाहीर मत व्यक्त केले आहे. युद्धात उद्ध्वस्त देशावर शासन करणे ही खरी परीक्षा ठरेल आणि तालिबानला शासन राबवता येत नाही. युद्धाच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानचा दुटप्पी खेळ सहन केला. कारण तेव्हा त्यांच्याकडे इतर पर्याय नव्हता. पाकिस्तानातील बंदर व हवाई क्षेत्रातून अफगाणिस्तानला आवश्यक अमेरिकन सैन्य उपकरणे पाठवण्यात आली.

संकट : पात्र २.५ लाख लोक अमेरिकेला जाण्यास मुकणार
अमेरिका प्रत्येक दिवशी २० हजार लोकांना काबूलमधून बाहेर काढत आहे. परंतु अमेरिकी व्हिसासाठी पात्र सुमारे २.५ लाख लोक आता मागेच राहून जातील. वॉरटाइम अलाइज ग्रुपने अफगाण रोजगाराच्या आकडेवारीचे विश्लेषण केले.

पाकिस्तान आमचे दुसरे घर, संरक्षण करू : तालिबान
तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद एका मुलाखतीत म्हणाला, पाकिस्तान दुसरे घर आहे आणि त्याच्याविरोधात काहीही होऊ देणार नाही. भारत-पाकिस्तान वादावर तो म्हणाला, दोन्ही देशांनी एकत्र बसून समस्येची सोडवणूक केली पाहिजे.

तालिबानने हमीद करझाई, अब्दुल्लास केले नजरबंद
तालिबानने माजी राष्ट्रपती हमीद करझाई व राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्लास नजरबंद केले आहे. त्यांची सुरक्षाही हटवण्यात आली आहे. दोन्ही नेते तालिबानसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चेतही सहभागी होते.

फ्रान्स आज रात्रीपर्यंत मोहीम चालवणार
काबूल विमानतळावरून आपल्या नागरिकांना शुक्रवारी रात्रीपर्यंत बाहेर काढण्याची मोहिम राबवली जाणार आहे, असे फ्रान्सने म्हटले आहे. जीन कास्टेक्स गुरूवारी म्हणाले, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांची ३१ ऑगस्टची डेडलाईन पाहून हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...