आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

154 वर्षांची परंपरा:अमेरिका : 46 राज्यांत गुलामांच्या स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू...

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा उत्सव साजरा करण्याची परंपरा १८६६ मध्ये सुरू झाली

अमेरिकेच्या ५० पैकी ४६ राज्यांत जूनटिंथ पर्वाला सुरुवात झाली. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या निमित्ताने हा आनंद सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांनी यंदा हा उत्सव आठवडाभर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपल, नाइकीसह काही खासगी कंपन्यांनी त्यासाठी सुटी जाहीर केली आहे. पहिल्या दिवशी अनेक राज्यांत रॅली काढण्यात आली. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियाचा त्यात समावेश आहे. छायाचित्र कॅलिफोर्नियाच्या ऑकलंड शहराचे आहे. येथील रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. हा उत्सव साजरा करण्याची परंपरा १८६६ मध्ये सुरू झाली होती. जून व नाइंटिन्थ यांच्या मिश्रणातून ‘जूनटिंथ’ शब्द तयार झाला. या वर्षी अमेरिकेत गुलामगिरीची कुप्रथा संपुष्टात आली होती.

बातम्या आणखी आहेत...