आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी सुरू:युक्रेन युद्धामध्ये रशियाच्या ड्रोनमध्ये अमेरिकेचे सुटे भाग?

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे ३०० दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात रशिया वापरत असलेल्या ड्रोनमधील सुटे भाग अमेरिकन बनावटीची आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांच्या प्रशासनाने या प्रकरणाची चाैकशी सुरू केली आहे.

व्हाइट हाऊसने त्यासाठी अनेक संस्थांची मदत घेऊन एका कृती दलाची स्थापना केली आहे. इराण व रशियावर निर्बंध असूनही अमेरिकेचे लष्करी साहित्य त्यांच्यापर्यंत कसे पाेहोचू शकले याचा तपास घेतला जाणार आहे. अमेरिका युक्रेनला १.८ अब्ज डाॅलरची (सुमारे १५ हजार काेटी रुपये) मदत देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...