आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US: Special Lounges In Schools For Children's Mental Health ... Experts Teach How To Celebrate Happiness

दिव्य मराठी विशेष:अमेरिका : मुलांच्या मानसिक आराेग्यासाठी शाळांमध्ये विशेष लाउंज... तज्ज्ञ शिकवताहेत, आनंद कसा साजरा करायचा, दु:खात काय करायचे

क्रिस्टिना कॅरन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी माेहीम : बरे वाटत नसल्यास अतिरिक्त सुटी

गेल्या दीड वर्षापासूनच्या महामारीच्या काळात काही क्षणी असे वाटले की पूर्ण जगाचे ओझे माझ्यावर आले आहे. असे वाटायचे, आपण प्रेशर कुकरमध्ये आहोत, जो चारही बाजूंनी बंद आहे... वाचण्याची आशा नाही. अखेर अशी वेळ येते जेव्हा तुम्ही कोसळता किंवा या स्थितीतून बाहेर येता.

हे दु:ख आहे अमेरिकेतील राज्य मेरीलँडच्या मोंटोगोमेरीतील १८ वर्षांचा विद्यार्थी बॅन बालमॅनचे. बॅन एकटाच नाही. अमेरिकेतील हजारो विद्यार्थी व किशोर अशाच मानसिक त्रासाला तोंड देत आहेत. बिघडत्या मानसिक आरोग्यामुळे किशोरांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी काही राज्ये विद्यार्थ्यांना ‘मेंटल हेल्थ डे ऑफ’ देत आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना मानसिक समस्या जाणवत असेल तेव्हा आठवड्यात एक दिवस जास्त सुटी घेऊ शकतील. दोन वर्षांत अॅरिझोना, कोलोराडाे, कनेक्टिकट, इलिनॉय, नेवादा, ओरेगॉन आणि व्हर्जिनियासारख्या राज्यांनी मुलांना मानसिक कारणावरून शाळेत गैरहजर राहण्यास परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे. उटाह येथे रिपब्लिकन खासदार माइक विंडर यांनी हे विधेयक आणले होते. त्यांना हा सल्ला सदर्न उटाह विद्यापीठात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीने दिला होता. एलिमेंटरी स्कूल मुख्याध्यापक शौना वर्दिंगटन सांगतात की, जेव्हा दबाव जाणवतो तेव्हा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येईल अशी जागा विद्यार्थ्यांना हवी असते. वेलनेस रूम यासाठीच आहे. समजा एखादा मुलगा गणिताला घाबरला तर तो काही काळ त्यापासून लांब जातो. तणावमुक्त झाल्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागतो. अशा प्रकरणात दिसून आले की, मुलांची कामगिरी आधीपेक्षा चांगली झाली आहे.

वेलनेस रूम: उपकरणांच्या मदतीने १० मिनिटांत तणावातून होतेय सुटका
विद्यार्थ्यांना तणावातून काढण्यासाठी उटाह येथे शाळांमध्ये वेलनेस रूम बनवल्या आहेत. यात दहा मिनिटांचा टायमर आहे. उपकरणांच्या मदतीने विद्यार्थी भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो. विद्यार्थ्यांत त्याचा फायदा दिसत आहे. कोलोराडोची १९ वर्षीय मेलोनी सांगते, माझ्या मित्राने आत्महत्या केली. दु:ख कसे व्यक्त करायचे हे मला समजत नव्हते. म्हणून मी मित्रांसोबत ओअॅसिस रूम बनवला. ते स्टुडंट लाउंजसारखे आहे, येथे सल्लागार व मानसिक आरोग्यतज्ज्ञ मदत करतात. आता राज्यातील अनेक शाळा हा पर्याय स्वीकारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...