आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेम्फिसमधील गोळीबारानंतर अमेरिका हादरली, 2 ठार:आरोपीने महिलेवर गोळी झाडून कार चोरली, गोळीबाराचे फेसबुकवर Live स्ट्रीमिंग

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. टेनेसी राज्यातील मेम्फिसमध्ये गोळीबार झाला. हा हल्ला 19 वर्षीय मुलाने केला आहे. एवढेच नाही तर त्याने या घटनेचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमही केल्याची माहिती आहे. यादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोपींनी अज्ञातांवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने मेम्फिस शहरात फिरत अंदाधुंद गोळीबार केला. आता त्याला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मेम्फिस पोलिस विभागाने आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला. हल्लेखोराचे नाव इझेकील केली असून तो 19 वर्षांचा आहे.
मेम्फिस पोलिस विभागाने आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला. हल्लेखोराचे नाव इझेकील केली असून तो 19 वर्षांचा आहे.

इझेकील केली असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, हल्ला केल्यानंतर त्याला पकडण्यात आले आहे. तो वारंवार वाहने बदलत असल्याने त्याला पकडण्यात खूप अडचणी येत होत्या. तो पहिल्यांदा निळ्या रंगाच्या कारमध्ये दिसला आणि शेवटी तो राखाडी रंगाच्या कारमध्ये दिसला होता. गोळीबाराची माहिती मिळताच आम्ही शोधमोहीम सुरू केली होती.

धोका लक्षात घेऊन पोलिसांनीही अलर्ट जारी केला होता. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले.
धोका लक्षात घेऊन पोलिसांनीही अलर्ट जारी केला होता. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राखाडी रंगाच्या कार चोरत असताना आरोपीनी त्यात बसलेल्या महिलेवर हल्ला केला. महिलेची प्रकृती सध्या कळू शकलेली नाही. आरोपींनी गोळीबाराचे थेट प्रक्षेपण केले. फेसबुकच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तो एका दुकानात गेला आणि तिथे त्याने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचे दिसून येते. FOX13 न्यूजनुसार, हल्लेखोराने 5 जणांना गोळ्या घातल्या. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

हँडगन घेऊन हल्लेखोर फिरत होता
हल्लेखोराकडे हँडगन होती, असे पोलिसांनी सांगितले. त्याने गॅस स्टेशनवर एका व्यक्तीवर गोळी झाडली. हल्ल्यात मृत आणि जखमी झालेल्या एकूण लोकांची संख्या किती आहे, याचा आम्ही शोध घेत आहोत. व्हिडिओमध्ये आरोपी 'मला न्याय हवा आहे' असे म्हणताना दिसत आहे. त्याला कोणत्या गोष्टीबद्दल दुःख होते, याचाही आम्ही शोध घेत आहोत.

बातम्या आणखी आहेत...