आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • US Terms Aug 29 Drone Strike In Afghanistan A Tragic Mistake That Killed 10 Civilians, Including Seven Children; News And Live Updates

नागरिकांनाच मारले:दहशतवादी समजून नागरिकांवरच हल्ला! 7 मुलांसह 10 अफगाणी झाले होते ठार, चूक लक्षात आल्यानंतर आता अमेरिकन लष्कराने मागितली माफी

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये 29 ऑगस्टला झालेल्या ड्रोन हल्ल्याला अमेरिकेने गंभीर चूक मानून माफी मागितली आहे. दरम्यान, या हल्ल्यात 7 मुलांसह 10 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेने पहिल्यांदाच सांगितले आहे. हा ड्रोन हल्ला इसिसच्या संशयितांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता, असे अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितले.

कारण अमेरिकन गुप्तचरांना इसिस काबूल विमानतळावर हल्ला करण्याचा विचार करत असल्याची सशक्त माहिती होती. तालिबानने यापूर्वी काबूल विमानतळावर दोन आत्मघातकी हल्ले केले होते. या हल्ल्यात 95 जण ठार तर अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये अमेरिकन सैन्यांचाही समावेश होता.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नष्ट झालेली गाडी. ही गाडीमध्ये स्फोटकांनी भरलेले असल्याची अमेरिकन अधिकाऱ्यांना संशय होता.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नष्ट झालेली गाडी. ही गाडीमध्ये स्फोटकांनी भरलेले असल्याची अमेरिकन अधिकाऱ्यांना संशय होता.

तपासानंतर निवेदन जारी
काबूलमधील ड्रोन हल्ल्याच्या तपासानंतर अमेरिकेने हे निवेदन जारी केले आहे. संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला असून काबूल हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना आहेत. आम्ही या चुकीची माफी मागतो आणि या भंयकर चुकातून शिकू असे वचन देतो असेही ऑस्टिन म्हणाले. तर दुसरीकडे, अमेरिकन सरकार मृतांच्या कुटुंबीयांना कशी भरपाई द्यावी याचे मूल्यांकन करत असल्याचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी म्हटले आहे.

संशयास्पद टोयोटा कारबाबत अमेरिकन गुप्तचर अहवाल चुकीचा
मॅकेन्झी पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या गुप्तचरांनी काबूल विमानतळावर इसिसचे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणाचा शोध घेतला होता. गुप्तचर यंत्रणेने लष्कराला पांढऱ्या टोयोटा कोरोला गाडीवर नजर ठेवण्यास सांगितले होते. या गाडीचा वापर इसिस हल्ल्यासाठी करणार आहे असे यंत्रणेने लष्कराला सांगितले होते. यानुसार, अमेरिकन लष्कराने त्या संशयित टोयोटा गाडीचा 8 तास मागोवा घेतला आणि त्याच्या हालचालीवरून ठरवलेल्या भागात त्याला लक्ष्य केले. परंतु संशयास्पद टोयोटा गाडीबाबतच अमेरिकन गुप्तचर अहवाल चुकीचा असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...