आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या टेक्सासमध्ये भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 मोजण्यात आली. पण रंजक गोष्ट म्हणजे नागरिकांना त्याचा एकही धक्का जाणवला नाही. लोकांनी खरेच भूकंप झाला काय? हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यात अनेक युजर्सनी या बातमीचे मीम्स तयार केले. तसेच अनेक इंटरेस्टिंग व फनी व्हिडिओ पोस्ट केले.
खरेच भूकंप झाला काय? हे लोकांना कळत नव्हते. ते एकच प्रश्न करत होते की, भूकंप झाला तर त्याचे धक्के जाणवले का नाही? अमेरिकन भूगर्भीय सर्वेनुसार, शनिवारी म्हणजे आज सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी भूकंप झाला. राष्ट्रीय हवामान अंदाजानुसार, हा टेक्सासच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा भूकंप होता.
सोशल मीडियावर युजर्सचा महापूर
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओंत नागरिक पळताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये नमूद आहे की, टेक्सासचे नागरिक भूकंपाची बातमी कन्फर्म करण्यासाठी ट्विटरवर गोळा होत आहेत. 5.4 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतरही टेक्सासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले नाही. त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. गत महिन्यात म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी वेस्ट टेक्सासच्या पेकोसमध्येही भूकंप आला होता. त्याची तीव्रता 5.3 होती. पण त्यातही फारसे नुकसान झाले नव्हते.
अधिकाऱ्यांचा दावा - 1500 जणांना जाणवले धक्के
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फनी व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर यूनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वेच्या (USGS) राष्ट्रीय अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमरिलो व एबिलीन शहरात राहणाऱ्या जवळपास 1500 जणांना भूकंपाचे धक्क जाणवले. त्यात काही लोकांच्या घरांना व कार्यालयांच्या भींतींना तडे गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.