आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या टेक्सास राज्यात मंगळवारी दुपारी धक्कादायक बातमी आली. टेक्सासमधील युवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये 18 वर्षीय तरुणाने गोळीबार केला. या हल्ल्यात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झाला असून 13 मुले, शाळेचे कर्मचारी आणि काही पोलीस जखमी झाले आहेत. हल्लेखोराने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी आजीलाही गोळ्या घातल्या. त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपण गन लॉबीच्या विरोधात आपण कधी उभे राहणार आहोत? पालक त्यांच्या मुलांना आता कधीही पाहू शकणार नाहीत. आज अनेक जीव चिरडले गेले आहेत. या वेदनांची आता कृतीत रुपांतर करण्याची वेळ आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोर मारल्याचा दावा केला आहे. त्याच्या ओळखीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. टेक्सासच्या शाळेत गोळीबाराची ही घटना 2012 मध्ये कनेक्टिकटमध्ये झालेल्या गोळीबाराशी मिळतीजुळती आहे. 14 डिसेंबर 2012 रोजी कनेक्टिकटमधील न्यूटाऊन येथील सॅंडी हूक एलिमेंटरी हायस्कूलमध्ये एका 20 वर्षीय व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यात 20 मुले होती. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात घातक सामूहिक गोळीबार होता.
टेक्सास शाळेतील गोळीबारात आतापर्यंत काय समोर आले आहे, सर्वात महत्त्वाचे पॉईंट
सोशल मीडियावर संशयिताचा फोटो, परंतु अधिकृत पुष्टी नाही
टेक्सासचे गव्हर्नर अॅबॉट यांनी मारेकरी साल्वाडोर रामोस असे सांगितल्यानंतर एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे इंस्टाग्राम पेज साल्वाडोर रामोसचे सांगितले जात आहे. यावर एका तरुणाचा मोबाईलसोबतचा फोटो आहे. याशिवाय रायफलचे फोटोही पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. हा टेक्सास गोळीबाराचा संशयित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप या फोटोंना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे इंस्टाग्राम पेजही शूटिंगनंतर काही वेळातच काढून टाकण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.