आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एका मॉलमध्ये शनिवारी गोळीबार झाला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 7 जण जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित शूटरला ठार केले आहे.
दरम्यान, या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक दिसत आहेत. तर हल्लेखोराची बॉडी देखील त्या व्हिडिओत दिसून येत आहे. तर त्याने हल्ल्यात वापरलेली बंदूकही त्याच्या शरीराजवळ पडलेली दिसली.
पाहा- टेक्सास शूटिंगचे 3 फोटो...
प्रत्यक्षदर्शी म्हणाला- मी अनेक मृतदेह पाहिले
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले- अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने कारवाई करून त्याला ठार केले. त्याचवेळी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णालयात उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागचे कारण सध्या आम्हाला माहित नाही. त्याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या घटनास्थळावर असलेल्या एका प्रत्यदर्शीने सांगितले की, मी खरेदी करत होतो. माझ्याकडे हेडफोन होते. अचानक गोळीबाराचा आवाज येऊ लागला. मी लपलो पोलिसांनी आम्हाला मॉलमधून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा मला अनेक मृतदेह दिसले. मी फक्त प्रार्थना करत होतो की, यात मुलांचा समावेश नसावा. परंतू सर्वात जास्त मृतदेह हे लहान मुलांचेच होते.
चार महिन्यांत गोळीबाराच्या 198 घटना
गन वायलेन्स आर्काइव्हनुसार, या वर्षात आतापर्यंत अमेरिकेत 198 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 30 एप्रिल रोजी टेक्सासमध्ये आणखी एक सामूहिक गोळीबार झाला. त्यादरम्यान आरोपींनी 5 जणांना गोळ्या घातल्या होत्या. यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश होता.
17 दिवसांपूर्वीच वाढदिवसाच्या पार्टीत झाली होती फायरिंग
17 एप्रिल रोजी अमेरिकेतील अलाबामा राज्यातील डेडविले येथे गोळीबारात 6 अल्पवयीनांचा मृत्यू झाला होता. 20 जण जखमी झाले. किशोरवयीन मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान ही घटना घडली. फॉक्स न्यूजने एका प्रत्यक्षदर्शीचा हवाला देऊन सांगितले - डेडविलेमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्याला स्वीट-16 असे नाव देण्यात आले. पार्टी संपणार असतानाच कोणीतरी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांतच पोलिस तेथे पोहोचले.
अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आणि 40 कोटी गन
नागरिकांच्या बंदुकीच्या मालकीच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. स्वित्झर्लंडच्या स्मॉल आर्म्स सर्व्हे म्हणजेच (SAS) च्या अहवालानुसार, जगात सध्या असलेल्या एकूण 857 दशलक्ष सिव्हिलियन गनपैकी 393 दशलक्ष सिव्हिलियन गन एकट्या अमेरिकेत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 5% अमेरिकेत आहे, परंतु एकट्या अमेरिकेकडे जगातील एकूण नागरी बंदुका 46% आहेत. ऑक्टोबर 2020 च्या गॅलप सर्वेक्षणानुसार, 44% अमेरिकन प्रौढ लोक बंदुकीसह घरात राहतात, यापैकी एक तृतीयांश प्रौढांकडे बंदूक आहे.
हे ही वाचा
US मध्ये बर्थ-डे पार्टीत गोळीबार, 6 मुले ठार:शूटर देखील अल्पवयीन, अमेरिकेत यंदा सामूहिक फायरिंगची 139 घटना
अमेरिकेच्या अल्बामा राज्यातील डेडविले या ठिकाणी रविवारी झालेल्या गोळीबारात सहा अल्पवयीनांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले. जखमींपैकी बहुतांश हे अल्पवयीन मुलेच आहेत. ही घटना किशोरवयीन मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. शेतात 6 अल्पवयीन मुलांचे मृतदेह मैदानात दिसून आले. आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या अटकेची किंवा मृत्यूची कोणतीही बातमी अद्याप समोर आलेली नाही. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.