आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रास्त्रे विक्री:अमेरिका तैवानला 1 अब्ज डाॅलरची शस्त्रे विकणार; चीनची नाराजी, वाद आणखी वाढणार, साैदा लवकर रद्द व्हावा

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका तैवानला १.१ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे विकणार आहे. त्यात ६० युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे, १०० हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्यास मंजुरी दिली आहे. या शस्त्रास्त्र सौद्यावर चीनने आक्षेप नोंदवला आहे. हा सौदा लवकरात लवकर रद्द झाला नाही तर अमेरिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेतील चीनच्या राजदूत कार्यालयाने दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लवकरच कडक प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलली जातील.

अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी अलीकडेच तैवान यात्रा केली होती. त्यामुळे अमेरिका व चीन यांच्यात तणाव वाढला. आता या सौद्यामुळे अमेरिकेने चीनला मात दिल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...