आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारी पडले युद्ध:150 लाख कोटी खर्चून अमेरिका आता अफगाणमधून बाहेर पडणार, 2400 सैनिकांच्या बलिदानानंतर अमेरिकी सैन्य मायदेशी परतणार

वाॅशिंग्टन (हेलेन कूपर, थॉमस गिब्बॉन्स)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने संपूर्ण सैन्य हटवल्यानंतरही अफगाणमध्ये गृहयुद्धाची शक्यता कमी

अमेरिकी सैनिक २० वर्षाने एका दीर्घ व महागड्या युद्धानंतर अफगाणिस्तानातून मायदेशी परतणार आहेत. ९/ ११ हल्ल्याच्या २० व्या स्मृती दिनी म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत सर्व सैनिक मायदेशी परततील. पूर्वी ही मुदत १ मेपर्यंत होती. परंतु अडीच हजारांहून जास्त सैनिक परतणार असल्याचे लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली. अल-कायदाच्या ९/११ हल्ल्यानंतर २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्याची तैनाती केली होती. या युद्धात अमेरिकेने २४०० सैनिकांचे बलिदान दिले. सोबतच अमेरिकेने या युद्धावर २ ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे १५० लाख कोटी रुपये खर्च केला. मे २०११ मध्ये अमेरिकेने आेसामा बिन लादेनला ठार करण्यात आले. परंतु तालिबान संघटनेचा खात्मा करू शकले नाहीत. अफगाणिस्तानात शांतताही नांदू शकली नाही. बायडेन प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, दीर्घ चर्चा व अनेक रिपब्लिकनने केलेल्या विरोधानंतरही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे. परिस्थितीला आधार मानून पाहिल्यास अमेरिकी सैनिक तेथून कधीही परतू शकणार नाहीत. या निर्णयानंतर गृहयुद्धाच्या शक्यतेमुळे वादाला ताेंड फुटले आहे.

अमेरिकेत संसर्गाचा वेग कायम, चिंता वाढली देशात रुग्णसंख्या मंगळवारी ७७ हजारांवर हे छायाचित्र एप्रिल २०१० चे आहे. अमेरिकी सैनिक अफगाणच्या मजार-ए-शरीफमध्ये उतरले होते. त्यानंतर अमेरिकेने २०११ मध्ये लादेनला ठार केले होते. भास्कर एक्स्पर्ट पीके चतुर्वेदी, मेजर जनरल (नि.), संरक्षण तज्ज्ञ

}अफगाणमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती होईल? अफगाणिस्तानची तुर्की, कतारसारख्या देशांसोबत परिषद होणार आहे. त्यात तुर्कीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तुर्की नाटोचाही भागीदार आहे. सद्य:स्थितीत अतिशय शक्तिशाली मानले जाते. तुर्कीच्या भूमिकेवर अफगाणमधील स्थिती स्पष्ट होणार आहे. गृहयुद्धाची शक्यता मात्र कमी आहे.

}आशियातील शांततेवर काय परिणाम होऊ शकतो? पाकिस्तान तालिबानला मदत करेल, हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत अमेरिकाही पावले उचलू शकते. सैन्य मायदेशी गेल्यानंतर अमेरिकेची भूमिका काय असेल यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील. तालिबानने हालचाली केल्यास अमेरिका हवाई हल्ल्यासारखी कारवाई करू शकते. पण त्याचा आशियातील शांततेवर काही परिणाम होणार नाही. कारण तालिबान पूर्वीसारखा मजबूत नाही.

} भारतावर त्याचा काय परिणाम होईल? आपल्याला त्यामुळे ना हानी ना लाभ. भारत तर अफगाणिस्तानची सर्व प्रकारे मदत करत आहे. आपण अफगाणिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षणही देत आहोत. भारत नंतर मदतीसाठी सैनिकही पाठवू शकतो. अफगाणकडे हेलिकॉप्टर, हवाई दल नाही. त्यासाठीही भारत मदत करू शकतो. शांतता असणे महत्त्वाचे आहे, असे भारताला वाटते. पाक व तालिबानवर विश्वास ठेवता येत नाही. तुर्कीने अफगाणची मदत केली तर शांतता राहील.

तालिबान, दहशतवादावर काय परिणाम होईल? अफगाणिस्तानात दोन प्रकारच्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. अफगाण तालिबान व पाकिस्तान तालिबान. त्याशिवाय सिरियाचे इसिस, हक्कानी गटही पाकसमर्थित तालिबानला मदत करतात. परंतु तालिबान संघटना पूर्वीसारखी सक्रिय राहिलेली नाही. महिलांनी बुरखा घालावा, शिक्षण घेऊ नये इत्यादी विचारही संघटनेने बदलले आहेत. सध्या तालिबानला अमेरिकी सैन्य देशात नकोय. अफगाणच्या ६० टक्के जमिनीवर तालिबानचे वर्चस्व आहे. परंतु अफगाणिस्तानचे सैन्य लढतेय. मरण्यासाठीदेखील सज्ज आहे.

}पाकवर काय परिणाम दिसेल? पाकिस्तानवर विशेष परिणाम दिसणार नाही. अमेरिकेचा दबाव आहे.

बातम्या आणखी आहेत...