आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत शुक्रवारी आणि शनिवारी आलेल्या वादळांमुळे मोठा विध्वंस झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 6 राज्यांना 30 वादळांचा तडाखा बसला आहे. वेगवेगळ्या भागात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. केंटकी राज्यातच, 80 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे आणि बरेच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
मेफिल्डमध्ये सर्वात जास्त विनाश झाला आहे, जो सर्व चक्रीवादळांचा ग्राउंड झिरो मानला जात आहे. मेफिल्डमध्ये मेणबत्तीचा कारखाना कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. इलिनॉय राज्यातील ॲमेझॉन कंपनीचे गोदाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली सुमारे 100 कामगार गाडले गेले आहेत. याशिवाय अर्कान्सासमध्ये नर्सिंग होमची इमारत कोसळून 20 लोक गाडले गेले, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला. पाहा वादळामुळे झालेल्या विध्वंसाची छायाचित्रे...
केंटकीचे गव्हर्नर म्हणाले - राज्याच्या इतिहासातील सर्वात भयानक वादळ
केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी या वादळाला आपल्या राज्याच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असल्याचे सांगितले. त्यांनी राज्यात आणीबाणीची स्थिती जाहीर केली असून, परिसरात बचाव पथके उपस्थित असून मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सर्वात जास्त विनाश मेफिल्ड परिसरात, वादळ 200 मैल प्रति तास
मेफिल्ड शहरातून बाहेर आलेली छायाचित्रे भयानक विनाश दर्शवतात. शहरातील जवळपास सर्वच घरांची पडझड झाली असून जागोजागी लोखंडी खांब वाकलेले असून, ते अतिशय भयावह दिसत आहेत. येथे वादळ सुमारे 70 मैल प्रतितास वेगाने सुरू झाले, जे 200 मैल प्रतितास वेगाने वाढले. वादळाची ही पातळी अत्यंत धोकादायक श्रेणीत ठेवली जाते.
ॲमेझॉनच्या गोदामात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची शक्यता आहे
रिपोर्टनुसार, एडवर्डसविले, इलिनॉयजवळील कोसळलेल्या ॲमेझॉन गोदामात अनेक आपत्कालीन वाहने पोहोचली आहेत. येथे जखमींची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही. मात्र एका व्यक्तीच्या मृत्यूला एपी या वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने फेसबुकवर "सामुहिक अपघाती घटना" असे वर्णन केले आहे.
मेणबत्तीचा कारखाना पडला, कैद्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेफिल्ड परिसरातील मेणबत्ती कारखान्याचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. गव्हर्नर बेशियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळ कारखान्यात आले तेव्हा सुमारे 110 लोक त्यात काम करत होते. येथे काही लोक दबले गेल्याची भीती आहे, त्यांना वाचवण्यासाठी जवळच्या ग्रेव्हज काऊंटी जेलमधील कैद्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. काही सूत्रांनी सांगितले की येथे 18 मृतदेह सापडले आहेत, परंतु राज्यपालांनी 10 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.