आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या 6 राज्यांत 53 चक्रीवादळे, 10 PHOTOS:अर्कान्ससमध्ये 4 ठार, 30 जखमी; मध्य अमेरिकेत 3 लाख घरांची वीज गुल

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्कान्ससची राजधानी लिटिल रॉकमध्ये चक्रीवादळांमुळे तब्बल 2100 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. - Divya Marathi
अर्कान्ससची राजधानी लिटिल रॉकमध्ये चक्रीवादळांमुळे तब्बल 2100 घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

अमेरिकेत शुक्रवारी 5 राज्यांत 53 टोर्नेडो अर्थात चक्रीवादळे आली. यामुळे अर्कान्सस, टेनेसी, इलिनॉयस, विस्कॉन्सिन, लोव्हा व मिसिसिपी प्रांतात प्रचंड नुकसान झाले. या चक्रीवादळांमुळे मध्य अमेरिकेतील जवळपास 3 लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अर्कान्ससमध्ये आतापर्यंत 4 जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या चक्रीवादळांमुळे अर्कान्ससमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. येथील जवळपास 65 हजार लोकांच्या घरांतील वीज पुरवठा बंद झाला आहे. विशेषतः राजधानी लिटिल रॉक शहरातील जवळपास 2100 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. इलिनॉयसमध्ये एका कॉन्सर्टवर छत कोसळले. त्यात 1 जण ठार, तर 28 जण जखमी झाले.

तत्पूर्वी, गुरुवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मिसिसिपीला पोहोचले होते. तिथे चक्रीवादळामुळे 26 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील टोर्नेडोमुळे झालेल्या नुकसानीचे 10 फोटो...

अर्कान्ससमध्ये गाडी चालवत असताना एका माणसाने चक्रीवादळाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
अर्कान्ससमध्ये गाडी चालवत असताना एका माणसाने चक्रीवादळाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
अर्कान्ससची राजधानी लिटल रॉक येथे वादळ धडकल्यानंतर अनेक घरे व झाडांची पडझड झाली.
अर्कान्ससची राजधानी लिटल रॉक येथे वादळ धडकल्यानंतर अनेक घरे व झाडांची पडझड झाली.
वादळानंतर अमेरिकेच्या अनेक राज्यांत सगळीकडे ढिगाऱ्यांचा ढिग दिसून आला.
वादळानंतर अमेरिकेच्या अनेक राज्यांत सगळीकडे ढिगाऱ्यांचा ढिग दिसून आला.
या एरियल व्ह्यूमध्ये चक्रीवादळामुअळे अनेक घरांची पडझड व वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
या एरियल व्ह्यूमध्ये चक्रीवादळामुअळे अनेक घरांची पडझड व वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
अर्कान्ससची राजधानी लिटिल रॉकमध्ये वादळामुळे कार अशी उलटली.
अर्कान्ससची राजधानी लिटिल रॉकमध्ये वादळामुळे कार अशी उलटली.
अमेरिकेच्या लोव्हामध्ये शुक्रवारी वादळामुळे अनेक कारी झाडांखाली अशा दबल्या गेल्या.
अमेरिकेच्या लोव्हामध्ये शुक्रवारी वादळामुळे अनेक कारी झाडांखाली अशा दबल्या गेल्या.
इलिनॉयसमध्ये चक्रीवादळामुळे अपोलो थिएटरचे छत कोसळले.
इलिनॉयसमध्ये चक्रीवादळामुळे अपोलो थिएटरचे छत कोसळले.
अर्कान्ससच्या लिटिल रॉकमध्ये वादळामुअळे एक स्टोअर पूर्णतः उद्ध्वस्त झाले.
अर्कान्ससच्या लिटिल रॉकमध्ये वादळामुअळे एक स्टोअर पूर्णतः उद्ध्वस्त झाले.
लोव्हाच्या कोर्लव्हिलेमध्ये वादळामुळे अनेक घरांचा ढिगारा कारींवर पडला.
लोव्हाच्या कोर्लव्हिलेमध्ये वादळामुळे अनेक घरांचा ढिगारा कारींवर पडला.
लिटिल रॉकध्ये टोर्नेडोमुळे घर कोसळल्याळे अग्निशमन दलाच्या जवानांनी एका महिलेचा बचाव केला.
लिटिल रॉकध्ये टोर्नेडोमुळे घर कोसळल्याळे अग्निशमन दलाच्या जवानांनी एका महिलेचा बचाव केला.