आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीख विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घालता येणार 'कृपाण':USविद्यापीठाने धोरण बदलले; 2 महिन्यांपूर्वी कृपाणधारी विद्यार्थ्यास झाली होती अटक

वॉशिंग्टन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत शीक्षण घेणाऱ्या शीख धर्मातील विद्यार्थ्यांना आता शिक्षण संस्थामध्ये देखील कृपाण (श्री साहिब-धर्माचे प्रतीक) घालता येणार आहे. अमेरिकेतील विद्यापीठाने आपले कॅम्पसमधील शस्त्र धोरणात बदल केला आहे. दोन महिन्यांपूर्वी एका शीख विद्यार्थ्याच्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमकं काय घडले होते

सप्टेंबरमध्ये महिन्यात एक शीख धर्मातील एक विद्यार्थी कृपाण (सिरी साहेब) परिधान करून नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात आला. तेव्हा त्याला कृपाण काढण्यास सांगण्यात आले. ते काढण्यास तो तयार नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

एका पोलिस अधिकाऱ्याने शीख विद्यार्थ्याने घातलेला कृपाण काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
एका पोलिस अधिकाऱ्याने शीख विद्यार्थ्याने घातलेला कृपाण काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काय आहे कृपाण, शीख बांधव का घालतात
शीख बांधव शौर्य आणि धैर्याचे लक्षण मानले जाणारे कृपाण कंबरेवर टांगतात किंवा पिशवीत ठेवतात. हे लहान तलवारीच्या आकारासारखे दिसते. आजकाल काही लोक कृपाण ऐवजी लहान सुऱ्या देखील ठेवतात. नवीन विद्यापीठ धोरणानुसार ब्लेडी (कृपाण) लांबी 3 इंचापेक्षा कमी असावी. असे सांगण्यात आले आहे. विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले की, आम्ही द शीख कोलिशन आणि ग्लोबल शीख कौन्सिलसह अनेक शीख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर जुन्या धोरणात बदल केले आहेत.

विद्यापीठाने विद्यार्थ्याची माफी मागितली
विद्यापीठाचे कुलपती शेरॉन एल. गॅबर आणि मुख्य विविधता अधिकारी ब्रॅंडन एल. वुल्फ म्हणाले- कृपाण घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या अटकेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. नवीन विद्यापाठीचे धोरणासाठी घेतलेल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

कृपाणचे महत्त्व मोठे

हे शिखांच्या पाच पवित्र स्थानांपैकी एक आहे. गुरू गोविंद सिंग यांनी शिखांसाठी पाच गोष्टी अनिवार्य केल्या होत्या - केश (केस न कापलेले), काडा (स्टील ब्रेसलेट), कृपाण, कचेरा (अंडरशॉर्ट्स) आणि कांगा. हे सर्व शिखांनी अनिवार्यपणे परिधान केलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...