आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्‍य मराठी विशेष:अमेरिकी विद्यापीठ देणार लैंगिक अत्याचारातील पीडितांना तब्बल 8 हजार काेटींची भरपाई; न्यायालयाचा दणका !

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर विद्यापीठाने केली होती चौकशी

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफाेर्निया विद्यापीठाला लैंगिक शाेषण प्रकरणात पीडित रुग्णांना १.१ अब्ज डाॅलर (सुमारे ८ हजार काेटी रुपये) नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. विद्यापीठातील डाॅक्टरांनी स्त्रीराेग अभ्यास शाखेच्या विद्यार्थिनींवर हा अत्याचार केला हाेता. हा काळा अध्याय असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. डॉ. जॉर्ज टिंडलच्या विरोधात कारवाई करण्याचेही विद्यापीठाने जाहीर करताना पीडितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेतला. शुक्रवारी याबाबतची घाेषणा झाली. लैंगिक शाेषण प्रकरणातील ही आतापर्यंत सर्वात माेठी भरपाई मानली जाते. विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रिक कारुसाे म्हणाले, आम्ही सगळ्या गाेष्टींचे संरक्षण करायला हवे. परंतु तसे करता आले नाही. २०१८ मधील प्रकरणाची साेडवणूक करण्यासाठी २१५ दशलक्ष डाॅलरची रक्कम देण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणातील भरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली नाही.

तिसरा करार ८५२ दशलक्ष डाॅलरचा हाेता. लैंगिक शाेषणाचे प्रकरण समाेर आल्यानंतर ही रक्कम विद्यापीठासाेबत जगातील सर्वात माेठी भरपाई ठरली. २०१६ दरम्यान एका विद्यार्थिनीने सर्वाेच्च न्यायालयात याबाबतचा खटला दाखल केला हाेता. तिने काेर्टाला एका लैंगिक शाेषणाची माहिती दिली. परंतु तपासात अशा अनेक घटना समाेर आल्या हाेत्या. त्यात डाॅक्टरांनी विद्यार्थिनी, रुग्णांचे शाेषण केले हाेते. हळूहळू पीडितांची संख्या ७०० पर्यंत गेली. २७ वर्षीय वकील माेर्ग यांनी काेर्टाच्या निवाड्याबद्दल समाधान व्यक्त केले.

साडेतीन लाख विद्यार्थिनींना ई-मेल
लैंगिक शाेषण प्रकरणात २०१८ च्या अखेरीस हे प्रकरण समाेर आले हाेते. तेव्हा ५०० महिलांनी विद्यापीठाच्या विराेधात गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर विद्यापीठाने एक तक्रार केंद्र स्थापन केले हाेते. त्यात विद्यापीठातील विद्यार्थिनी, अध्यापक वर्गास हाॅटलाइन व संकेतस्थळाद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले हाेते. तेव्हा साडेतीन लाख विद्यार्थ्यांना तक्रारीबद्दल सविस्तर ई-मेल पाठवला होता.

बातम्या आणखी आहेत...