आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • America Reaction On Indian Chinese Soldiers Clash In Line Of Actual Control (LAC) In Galwan Valley Ladakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन संघर्ष:अमेरिकेने म्हटले - एलएसीच्या परिस्थितीवर आमची करडी नजर, यूएन चीफ म्हणाले- दोन्ही देशांनी संयम दाखवावा

नवी दिल्ली / वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गालवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यांनी घेतली माघार
  • भारताचे 20 जवान शहीद, तर चीनमध्ये 43 सैनिक ठार झाल्याचे वृत्त

लडाखच्या गालवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीवर अमेरिकेचे वक्तव्य आले आहे. मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेने हे निवेदन जारी केले. अमेरिकेने म्हटले की - दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावावर आमची करडी नजर आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2 जून रोजी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. यावेळी भारत आणि चीनमधील सीमा वादावर चर्चा झाली होती. 

सोमवारी रात्री गालवन खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताच्या एका कमांडिंग ऑफिसरसोबतच भारताचे 20 जवान शहीद झाले होते. न्यूज एजेंसीनुसार, चीनचेही 43 सैनिक मारले गेल्याचे आणि जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

व्हाइट हाउसमध्ये मीटिंग 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता व्हाइट हाउसमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये गुप्तचर यंत्रणांनी भारत-चीन वादाचा अहवाल सादर केला. या बैठकीत परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओदेखील सहभागी झाले होते. बैठकीनंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. अमेरिकेने म्हटले की, 'आम्ही एलएसीच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. 20 भारतीय सैन्य जवान शहीद झाले आहेत. यावर अमेरिकेने शोक व्यक्त केला. आमच्या संवेदना सैनिकांच्या कुटूंबियांसोबत आहे. '

शांती समाधान ठेवा 
अमेरिकेने आपल्या निवेदनात म्हटले की, 'भारत आणि चीन दोघांनीही तणाव कमी करणार असल्याचे सांगितले आहे. हा प्रश्न शांततापूर्व सोडवण्याता यावा असे अमेरिकेचे मत आहे. राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यांच्या 2 जून रोजी फोनवर बातचित झाली होती. यादरम्यान भारत-चीन सीमा वादावर चर्चा झाली होती.'

दोन्ही सैन्य मागे हटले 
न्यूज एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, गालवान खोऱ्यातील ज्या पेट्रोल पॉइंटवर दोन्ही देशांची चकमक झाली होती. आता तेथे शांततापूर्ण वातावरण आहे. दोन्ही देशांच्या तुकड्या या मागे हटल्या आहेत. 

संयुक्त राष्ट्राने काय म्हटले?
संयुक्त राष्ट्राचे महासचिवांच्या प्रवक्त्यांनीही भारत चीन सीमा वादावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आम्ही एलएसीवर होत असलेल्या घटनाविषयी माहिती घेतली आहे. दोन्ही देशांनी संयम दाखवावा. दोन्ही देश हे तणाव कमी करण्याच्या विषयावर भाष्य करत आहे हीच चांगली गोष्ट आहे. 

बातम्या आणखी आहेत...