आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अँथनी फाउची यांची माहिती:अमेरिकेच्या लसी भारतात आढळलेल्या कोरोना विषाणू स्ट्रेनवर गुणकारी

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत फायझर आणि माॅडर्नाची लस लोकांना दिली जात आहे

अमेरिकेत कोरोनावरील उपलब्ध लसी भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या घातक स्वरूपावर गुणकारी आहेत. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षी प्रथमच भारतात आढळलेल्या कोरोनाच्या बी.१.१६७ या नव्या स्ट्रेनला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक स्तरावर ‘चिंतित करणारे स्वरूप’ असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्ग रोग संस्थेचे (एनआयएआयडी) संचालक आणि राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डाॅ. अँथनी फाउची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, बी.१.१६७ आणि बी.१.१६८ हे दोन्ही प्रकार भारतात आढळले आहेत. त्यांना निष्प्रभ करण्यात आले आहे. व्हाइट हाऊसचे कोविड-१९ वरील ज्येष्ठ सल्लागार अँडी स्लॅव्हिट यांनी सांगितले की, अमेरिकेत उपलब्ध लसी कोरोना विषाणूच्या भारतात आढळलेल्या स्वरूपात गुणकारी आहेत.

अमेरिकेत फायझर आणि माॅडर्नाची लस लोकांना दिली जात आहे. त्यावर न्यूयाॅर्क विद्यापीठाच्या ग्रासमॅन स्कूल आॅफ मेडिसिन आणि लँगोन सेंटर यांनी एकत्रित अभ्यास केला आहे. या दोन्ही लसी कोरोनाच्या नव्या स्वरूपाचा संसर्ग रोखण्यास गुणकारी आहेत, असे प्रा. नाथनेइल आणि लँडाऊ यांना या अभ्यासात आढळले.

बातम्या आणखी आहेत...